Video - ... अन् मुलीसमोरच पत्रकारावर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 01:03 PM2020-07-21T13:03:48+5:302020-07-21T13:04:36+5:30
मुलीसोबत घरी जात असताना गुंडांनी पत्रकारावर हल्ला केला. ही धक्कादायक घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
गाझियाबाद - उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. काही गुंडांनी मुलीसमोरच एका पत्रकारावर गोळ्या घालून हत्येचा प्रयत्न केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. विक्रम जोशी असं या पत्रकाराचं नाव असून मुलीसोबत घरी जात असताना गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. ही धक्कादायक घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विक्रम जोशी यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गाझियाबादच्या विजयनगर भागातून विक्रम जोशी आपल्या बाईकवरून मुलीसोबत प्रवास करत होते. यावेळी काही गुंडांनी मागून येऊन त्यांना घेरलं. तसेच जोशी यांना बेदम मारहाण करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पसार झाले. हा सगळा प्रकार जोशी यांच्या मुलीच्या डोळ्यांदेखत घडला असून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
गाजियाबाद में पत्रकार विक्रम जोशी को बीच सड़क पर गोली मार दी गयी,
— UP East Youth Congress (@IYC_UPEast) July 21, 2020
गुनाह सिर्फ इतना है कि उन्होंने अपनी भांजी के साथ हुई छेड़छाड़ की रिपोर्ट थाने में लिखाई थी । #योगी_का_जँगलराजpic.twitter.com/lsOY8MSRhV
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जोशी यांनी आपल्या भाचीसोबत झालेल्या छेडछाडीची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळेच हा हल्ला झाला असावा असा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या जोशी यांना गाझियाबादच्या यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत.
विक्रम जोशी यांचा भाऊ अनिकेत जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत यांच्या मुलीसोबत काही दिवसांपूर्वी छेडछाडीची घटना घडली होती. त्यांचा विरोध विक्रम जोशी यांनी करत यासंबंधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यामुळेच सोमवारी सायंकाळी विक्रम यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा संशय अनिकेत यांनी व्यक्त केला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : "आई खूप जास्त जवळची... शेवटच्या क्षणी तिला आयसीयूच्या खिडकीतून पाहायचो पण..."https://t.co/hotSV04ymm#CoronaUpdates#CoronaVirus
— Lokmat (@MiLOKMAT) July 21, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : भारीच! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने कोरोनाला असं लावलं पळवून
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाग्रस्तांसाठी 'हे' औषध ठरतंय संजीवनी; 79 टक्के धोका झाला कमी
CoronaVirus News : अरे व्वा! कोविड सेंटरमध्येच रुग्णांनी केला भन्नाट डान्स, Video तुफान व्हायरल
धक्कादायक! ...म्हणून चिमुकल्यावर आली आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ
"पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती"