Video : नशीब बलवत्तर! लाॅन्चमधून समुद्रात प्रवासी पडला, पोहता येत असल्याने वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 04:13 PM2022-02-08T16:13:53+5:302022-02-08T17:14:34+5:30
Drowning Case : सुदैवाने त्या प्रवाशाला पोहता येत असल्यामुळे तो सुखरूप बोटीत परतला. या घटनेमुळे जल प्रवासादरम्यान प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर कशी आहे. हे पुन्हा सिध्द झाले आहे.
निखिल म्हात्रे अलिबाग - गेट वे मुंबई येथून मांडवा, अलिबागकडे येणार्या अजंटा लॉन्चमधून एक प्रवाशी समुद्रात पडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने त्या प्रवाशाला पोहता येत असल्यामुळे तो सुखरूप बोटीत परतला. या घटनेमुळे जल प्रवासादरम्यान प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर कशी आहे. हे पुन्हा सिध्द झाले आहे. प्रशांत खामकर असे पाण्यात पडलेल्या प्रवाशांचे नाव आहे. प्रशांत यांनी आपण स्वतःच्या चुकीमुळे पडलो असल्याचे मांडवा पोलिस ठाण्यात लेखी दिले आहे, अशी माहिती पाेलिस सहायक निरीक्षक राजा पाटील यांनी दिली.
आज सकाळी नऊ वाजता गेट वे वरून सुटलेली अजंटा लॉन्च मांडवा-अलिबागकडे येत होती. मांडव्यापासून काही अंतरावर असतानाच बोटीच्या गेटला लावलेली फळी तुटली. त्यामुळे प्रशांत खामकर हा प्रवाशी थेट समुद्रात पडला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अलिबाग - लाॅन्चमधून समुद्रात प्रवासी पडला, पोहता येत असल्याने वाचला जीव pic.twitter.com/jDxB55eBY4
— Lokmat (@lokmat) February 8, 2022