Video : नवी मुंबईत खळबळ! शाळेजवळ आढळली बेवारस बॅग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 14:52 IST2019-02-27T14:51:21+5:302019-02-27T14:52:56+5:30
बीडीडीएस पथक बॅगच्या पडताळणी करीत आहे.

Video : नवी मुंबईत खळबळ! शाळेजवळ आढळली बेवारस बॅग
नवी मुंबई - अलीकडेच बोरिवली येथे गोराई परिसरात बॉम्बसदृश्य खेळणं आढळून आल्याने खळबळ माजली होती. त्यानंतर आज नवी मुंबईत सानपाडा सेक्टर 5 येथे मराठी शाळेजवळ दुपारी बेवारस बॅग आढळून आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर घातपात टाळण्यासाठी नजीक असलेल्या दत्त मंदिर विदयालय शाळेतील विद्यार्थी यांना घरी सोडण्यात आले आहे. त्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) पाचारण केले आहे. बीडीडीएस पथक बॅगच्या पडताळणी करीत आहे.