पतीच्या क्रूरतेचा VIDEO, दारुड्याने मारहाण करून पत्नीचा हात तोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 06:29 PM2022-06-03T18:29:18+5:302022-06-03T18:31:32+5:30
Husband Assaults Wife : शरीरावर काळया - निळ्या रंगाच्या खुणा आहेत. ही महिला या पुरुषाची पत्नी आहे. पीडित रोशनी देवी हिचा विवाह दीपकसोबत २०१० मध्ये झाला होता.
अलीगढच्या नाडा बाजीदपूर गावातून एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक पुरुष जमिनीवर पडलेल्या महिलेवर एकामागून एक हल्ला करत आहे. हा पुरुष महिलेला जबर मारहाण करत आहे. मारहाणीमुळे महिलेच्या एका हाताला फ्रॅक्चर झाले. शरीरावर काळया - निळ्या रंगाच्या खुणा आहेत. ही महिला या पुरुषाची पत्नी आहे. पीडित रोशनी देवी हिचा विवाह दीपकसोबत २०१० मध्ये झाला होता.
या मारहाणीचा व्हिडिओ शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. रोशनीने सांगितले की, पतीला दारू पिण्याचे व्यसन आहे. दररोज तो दारूच्या नशेत घरी येतो आणि तिला मारहाण करतो. पतीचे घरचे लोक त्याला माझ्याविरुद्ध भडकवतात. रोशनीच्या हाताला फ्रॅक्चर झाले. पती रोशनीला मारहाण करत असताना ती सासरच्या मंडळींना वाचवण्यासाठी विनवणी करत होती, मात्र कोणीही मदतीला आले नाही.
ही घटना 30 मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. दारूच्या नशेत दीपक घरी पोहोचला आणि दरवाजा बंद करून रोशनीला पट्ट्याने मारहाण करू लागला. रोशनी देवीने तिला सासरच्यांपासून वाचवण्यासाठी लाख विनंत्या केल्या, पण कोणीही तिला वाचवायला आलं नाही.
हाताचे हाड तुटले
रोशनीचे माहेरची मंडळी दुसऱ्या दिवशी तिच्या सासरच्या घरी पोहोचले. मात्र, तोपर्यंत आरोपी दीपक तेथून पळून गेला होता. नियंत्रण कक्षाच्या माहितीवरून डायल 112 वर नियंत्रण कक्षास माहिती मिळाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचला आणि पीडित महिलेला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी रोशनी देवी यांचे जिल्हा रुग्णालयात मेडिकल केले. तपासादरम्यान रोशनी देवीचा हात मोडल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा दीपकने तिला बेदम मारहाण केली होती. त्यावेळी शेजाऱ्याने मोबाईलवरून व्हिडिओ बनवला होता. पोलिसांनी या प्रकरणी व्हिडिओचा आधार घेतला आहे.
पबमध्ये भेटलेल्या विद्यार्थ्यांनी कारमध्ये अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप
एसएसपींना विनंती केली
रोशनी देवी यांनी सांगितले की, या व्हिडिओसह त्यांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली, परंतु 2 दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी दीपकवर कोणतीही कारवाई केलेली नाही. पीडितेने गुरुवारी एसएसपीकडे तक्रार करून न्याय मागितला. त्यानंतर संध्याकाळी उशिरा सीओ फर्स्ट अशोक कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.