शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचा स्टोअर रुममधला व्हिडीओ व्हायरल, निलंबनाची केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 10:00 PM2022-04-24T22:00:23+5:302022-04-24T22:00:57+5:30

Sexual Relation : प्राथमिक चौकशीनंतर प्रशासनाने लैंगिक गैरवर्तनात सहभागी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित केले.

Video of the headmaster in the store room with the teacher went viral, suspension action | शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचा स्टोअर रुममधला व्हिडीओ व्हायरल, निलंबनाची केली कारवाई

शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचा स्टोअर रुममधला व्हिडीओ व्हायरल, निलंबनाची केली कारवाई

googlenewsNext

रायपूर - छत्तीसगडच्या कांकेरच्या सरकारी हायस्कूलमध्ये काम करणाऱ्या मुख्याध्यापकाला, ज्याने शाळेच्या स्टोअररूमला लैंगिक गैरवर्तन आणि वैयक्तिक आनंदासाठी गुप्त जागा बनवल्याचा आरोप आहे.  त्याला गावकऱ्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात आले आणि नंतर जिल्हा प्रशासनाने निलंबित केले.

प्राथमिक चौकशीनंतर प्रशासनाने लैंगिक गैरवर्तनात सहभागी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित केले. छत्तीसगड राज्यातील कांकेर येथे असलेल्या एका शाळेत घडला आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याच शाळेतील शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध होते. एवढंच नाही तर हे दोघे अनेकदा शाळेतल्याच एका बंद वर्गात गैरकृत्य करायचे. या गैरप्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. 

गेल्या ९ वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरू होता. अनेकदा लोकांनी दोघांना शारीरिक संबंध ठेवताना रंगेहात पकडले, मात्र पुराव्याअभावी त्यांच्यावर कारवाई झाली नाही. यावेळी मात्र लोकांनीच व्हिडिओ बनवून व्हायरल केला, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपी मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे. हे संपूर्ण प्रकरण इंद्रप्रस्थ गावातील पीव्ही ३९ येथील शाळेतले आहे. राजेश पाल हा मुख्याध्यापक म्हणून या शाळेत काम करतो. त्याचे माध्यमिक शाळेतील विवाहित महिला कर्मचाऱ्याशी त्याचे अनैतिक संबंध होते. अनेकदा हे दोघेही शाळेतच शीरिरीक संबंध ठेवायचे. सुट्टीच्या दिवशी दोघेही शाळेत भेटायचे. मग मुख्याध्यापकाच्या रूमला लागून असलेल्या स्टोअर रूममध्ये शारीरिक संबंध ठेवत. गावातील लोकांनाही याची माहिती होती.

Web Title: Video of the headmaster in the store room with the teacher went viral, suspension action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.