Video: “मी खूप कंटाळलोय, आज माझं जीवन संपवायला निघालोय”; मृत्यूपूर्वी पोलीस FB Live मध्ये ढसाढसा रडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 11:51 AM2021-05-17T11:51:33+5:302021-05-17T11:53:16+5:30

पोलीस विभागात होत असलेल्या छळाला कंटाळून जितेंद्रने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी जितेंद्रने फेसबुक लाईव्ह केलं होतं.

Video of up police constable Jitendra Chouhan facebook live before suicide goes viral | Video: “मी खूप कंटाळलोय, आज माझं जीवन संपवायला निघालोय”; मृत्यूपूर्वी पोलीस FB Live मध्ये ढसाढसा रडला अन्...

Video: “मी खूप कंटाळलोय, आज माझं जीवन संपवायला निघालोय”; मृत्यूपूर्वी पोलीस FB Live मध्ये ढसाढसा रडला अन्...

Next
ठळक मुद्देजितेंद्र चौहानच्या आत्महत्येनंतर उत्तर प्रदेश पोलीस विभागावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेतमागील वर्षी मेरठ जिल्ह्यातील एका महिला उपनिरिक्षकाने छळाचा आरोप करत आत्महत्या केली होती२०१६ मध्ये ते पोलीस सेवेत दाखल झाले होते. सध्या ते बीसलपूरच्या कोतवाली येथे १०० नंबरच्या गाडीवर तैनात होते

पीलीभीत – उत्तर प्रदेश पोलिसातील अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. मागील वर्षी मेरठ जिल्ह्यातील एका महिला उपनिरिक्षकाने छळाचा आरोप करत आत्महत्या केली होती. वरिष्ठांकडून मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप या महिला पोलीस अधिकाऱ्याने केला होता. त्यानंतर आता आणखी एक असं प्रकार समोर आला आहे.  

वरिष्ठाकडून छळ होत असल्याचा आरोप करत पोलीस शिपाई जितेंद्र चौहान यांनी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीलीभीतच्या बीसलपूर कोतवाली येथे ही घटना घडली आहे. पोलीस विभागात होत असलेल्या छळाला कंटाळून जितेंद्रने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी जितेंद्रने फेसबुक लाईव्ह केलं होतं. यात वारंवार तो पोलीस विभागातील छळाने कंटाळलोय असं म्हणताना दिसत आहे.

जितेंद्र चौहानच्या आत्महत्येनंतर उत्तर प्रदेश पोलीस विभागावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. जितेंद्र चौहान हा शामलीच्या उस्मानपूर येथे राहणारे आहेत. २०१६ मध्ये ते पोलीस सेवेत दाखल झाले होते. सध्या ते बीसलपूरच्या कोतवाली येथे १०० नंबरच्या गाडीवर तैनात होते. जितेंद्र चौहान यांची पत्नी सरिता चौहान यादेखील बीसलपूरच्या कोतवाली येथे तैनात आहेत. पीलीभीतच्या मार्गावर जितेंद्र चौहान यांचा मृतदेह कारमध्ये मृत अवस्थेत सापडला. ज्यात त्यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे.

प्रथमदर्शनी पोलिसांना हे प्रकरण आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु घटनास्थळी एकही हत्यार सापडलं नाही. मग जितेंद्रने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली तर ती बंदूक गेली कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस या घटनेचा सर्व अँगलने तपास करत आहेत. दुसरीकडे असंही सांगितलं जात आहे की, जितेंद्र चौहान यांना सुट्टी न मिळाल्यामुळे वरिष्ठांवर नाराज होते. पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावत आत्महत्येसाठी कौटुंबिक कलह असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच जितेंद्र चौहान यांची पत्नी सरिता यांची बिलसंडा पोलीस ठाण्यातून बदली होऊन बीसलपूर येथे तैनात झाली होती.

गेल्या २-३ दिवसापासून पती-पत्नीमध्ये वाद-विवाद सुरू होते. शनिवारी दुपारी जितेंद्र चौहान यांनी फेसबुक लाईव्ह करत रडत रडत व्हिडीओ बनवला होता. त्यात तो म्हणत होता की, मी खूप कंटाळलोय, माझी जगण्याची इच्छा नाही मी आत्महत्या करायला चाललोय असं ते सांगत होते. त्यावेळी जितेंद्र गाडी चालवत असल्याचं दिसून येते. जितेंद्रचं फेसबुक लाईव्ह पाहताच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली परंतु त्याआधीच जितेंद्रने स्वत:ला गोळी मारल्याची घटना घडली.   

 

Read in English

Web Title: Video of up police constable Jitendra Chouhan facebook live before suicide goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस