Video : मास्क घातला नाही म्हणून जोधपूरमधील पोलिसाने दिला गळ्यावर पाय; नेटिझन्सना आठवला जॉर्ज फ्लॉईड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 09:04 PM2020-06-05T21:04:25+5:302020-06-05T21:09:12+5:30
मारहाण केलेल्या व्यक्तीचा दोष असा होता की, त्याने मास्क घातलेला नव्हता आणि पोलीस कारवाई करू इच्छित होते.
जोधुपर - अमेरिकेत अश्वेत व्यक्ती असलेल्या जॉर्ज फ्लॉईडचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनीपोलिसाला अटक केली आहे. अमेरिकेत घडलेल्या या प्रसंगासारखा थोडाफार सारखा प्रकार जोधपूर येथे घडली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याने एका व्यक्तीच्या तोंडावर गुडघे टेकून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मारहाण केलेल्या व्यक्तीचा दोष असा होता की, त्याने मास्क घातलेला नव्हता आणि पोलीस कारवाई करू इच्छित होते.
गुरुवारी दुपारी जोधपूरमध्ये ही घटना घडली. इकडे मुकेश प्रजापत हा चौपासनी हाऊसिंग बोर्डावर असलेल्या बसस्टॉपवर उभा होता. दरम्यान, दोन पोलिस त्याच्याकडे आले आणि मास्क न घातल्यामुळे त्याच्याकडे विचारणा करू लागले. त्यावेळी मुकेशने पोलिसांना सांगितले की, मास्क घातलेला आहे. परंतु मास्क तोंडावर नसून त्यांच्या नाकाखाली असल्याचे सांगून पोलिसांनी त्याला सोबत येण्यात सांगितले. नंतर या दोघांमध्ये वादविवाद झाला आणि मग हे प्रकरण जोरदार भांडणापर्यंत पोचले.
Coronavirus : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण; कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात हलवलं
अभियंता असलेल्या मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने केला प्रहार अन्...
पोलिसांच्या कारवाईपासून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना मुकेशला पोलिसांनी पकडले. या वेळी गोंधळ उडाला. एका पोलिस कर्मचाऱ्याने मुकेशला पकडले. ज्यामुळे दुपारच्या ४४ डिग्री सेल्सिअस तापमान असताना मुकेशला जमिनीवर पडून आणि त्याच्यावर पोलिसाने गुडघा ठेवला. मुकेशला पकडण्यात पोलिसांना आणखी दोन वाटसरूंनी मदत केली. असे असूनही, पोलीस त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि तो पोलिसांना राग देत राहिला. पण नंतर पोलिसांनी त्याला पकडून मारहाण केली.
या घटनेनंतर पोलिसांनी मुकेशला तातडीने देवनगर पोलिस ठाण्यात दाखल केले आणि सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला. देवनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी सोमकरण चरण यांनी सांगितले की, मुकेश याच्यावर पोलिसांवर हल्ला केल्याबद्दल आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#GeorgeFloyd moment for Congress In Jodhpur,Rajasthan police place their knee on the neck of a man pic.twitter.com/orFAquVkwF
— Chayan Chatterjee (@Satyanewshi) June 5, 2020