Video : पोलिसांना लवकरच मिळणार खुशखबर; १२ तास ड्युटी केल्यानंतर २४ तास मिळणार आराम
By पूनम अपराज | Published: August 8, 2021 06:45 PM2021-08-08T18:45:17+5:302021-08-08T18:46:24+5:30
Police will get good news soon : पोलिसांच्या १२-१२ तास ड्युटीच्या प्रश्नावर देखील उत्तर मार्ग काढत असल्याची माहिती दिली आहे.
पूनम अपराज
महाराष्ट्र पोलीस दलात काही पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच याबाबतचे आदेश येण्याची शक्यता आहे. काही कारणास्तव हे आदेश लांबणीवर गेले आहेत. मात्र, तडफदार आणि कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या संजय पांडे यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि पोलीस दलातील प्रलंबित कामं मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच महत्वाची गोष्ट म्हणजे आज राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्ह माध्यमातून राज्यभरातील अनेक पोलिसांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यादरम्यान पोलिसांच्या १२-१२ तास ड्युटीच्या प्रश्नावर देखील उत्तर मार्ग काढत असल्याची माहिती दिली आहे.
संजय पांडे हे आठवड्यातून एकदा पोलीस दलातील प्रत्येक पोलिसांपर्यंत आणि जनसामान्यांना आपल्या कामाचा लेखाजोखा पांडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून देत असतात. त्यामुळे त्यांची पोलीस दलाबरोबरच इतर नागरिकांकडून प्रशंसा केली जात आहे. महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल होणार आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आज दुपारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यभरातून अनेक पोलिसांशी संवाद साधला. त्यामुळे पोलीस कोणकोणत्या समस्यांना सामोरे जात आहेत. याबाबत पांडे यांनी माहिती जाणून घेतली आणि त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या कोविडमुळे प्रत्यक्ष भेट नेहमीच शक्य नसल्याने सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून पांडे यांनी राज्याच्या पोलीस दलाला सोशल मीडियाद्वारे किनेक्टेड ठेवले आहे. अनेकांनी या फेसबुक लाइव्हमध्ये थेट आपल्या समस्या डीजी यांना कमेंट बॉक्समधून विचारल्या आणि डीजींनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर लाईव्ह माध्यमातून दिले.
या फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना संजय पांडे यांनी पोलिसांच्या प्रलंबित प्रश्नाला हात घातलाच. मात्र, पोलीस दलात घोंघावणारा ड्युटीच्या प्रश्नावर देखील भाष्य करत राज्यातील पोलिसांना खुशखबर दिली आहे. पोलिसांना वाढीव कामाच्या तासांमुळे तणावाला सामोरे जावं लागतं. पांडे म्हणाले, पोलिसांनी १२ तास ड्युटी केल्यानंतर त्यांना २४ तास आराम मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहेत. तसेच फेसबुक लाईव्ह माध्यमातून एका पोलिसाने २०११ च्या सागरी PSI बॅचच्या प्रोमोशनची विनंती प्रलंबित असल्याची विचारणा केली. त्याववर पांडे यांनी संबंधित एसपी यांच्याकडून माहिती घेऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली. तसेच अनेकांनी वेगवेगळे सल्ले देखील दिले. संजय पांडे यांच्या या फेसबुक लाईव्हला ६ हजार लाईक्स तर १९ हजार कमेंट्स आल्या आहेत. तसेच १०७ जणांनी शेअर देखील केले आहे.