Video : Salute To Traffic Police...अन् अखेर ट्राफिक पोलिसांनीच हाती घेतले फावडे!
By पूनम अपराज | Published: October 5, 2020 05:51 PM2020-10-05T17:51:18+5:302020-10-05T17:52:18+5:30
Traffic Police : याबाबत फोटो आणि वव्हिडीओ व्हायरल झाले असून या पोलिसांचे कौतुक करण्यात आले.
दादर येथील टिळक पुलावर पडलेल्या सिमेंटमुळे वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला, तेव्हा दादर वाहतूक विभागाचा काही पोलिसांनी खाकीतील प्रसंगावधान दाखवत वाहतुकीच्या सुरळीत करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी स्वतः हातात फावडे घेऊन पुलावर सांडलेले सिमेंट बाजूला केले. याबाबत फोटो आणि वव्हिडीओ व्हायरल झाले असून या पोलिसांचे कौतुक करण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे होणारे अपघात टळले असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
सुखकर प्रवासासाठी रस्त्यावर सांडलेले सिमेंट बाजूला करणाऱ्या पोलिसांची नावे पोलीस कॉन्स्टेबल तडवी, पोलीस कॉन्स्टेबल कंगणे, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल नेटके अशी आहेत. या पोलिसांनी रस्ता मोकळा करण्यासाठी आणि मुंबईकरांना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून केला. पुलावर सांडलेले सिमेंट बाजूला करण्यासाठी कोणी येईल याची वाट न बघता स्वतः ट्राफिक पोलिसांनी फावडे हातात घेउन सिमेंट बाजूला ओढून रस्ता वाहतुकीसाठी सोयीचा केला. दरम्यान, मोठ्या प्रमाणात मोटरसायकलस्वार घसरू नये याची खबरदारी घेऊन ,फायरब्रिगेड येण्याअगोदर पूर्ण सिमेंटचा चिखल पोलिसांनी स्वतः काढून घेतला. जे - जा करणाऱ्या सर्व प्रवाश्यांनी या पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. याबाबत मुंबई पोलिसांनी केली दाखल घेऊन याची माहिती त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून सर्वांपर्यंत पोहचवली आहे.
Paving The Road For A Safer Mumbai!
— Mumbai Police (@MumbaiPolice) October 4, 2020
When cement fallen on Tilak Bridge made vehicular movement risky, Dadar Traffic Department wasted no time.
PC Tadvi, PC Kangane, PC Waghmode & PC Netke took it upon themselves to clear the road & ensure safety to Mumbaikars. #MumbaiFirstpic.twitter.com/z6I9IzDJyf