Video : समीर वानखेडेंच्या खबऱ्याच्या जीविताला धोका; पोलिसांकडे केली संरक्षणाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 06:04 PM2021-10-27T18:04:46+5:302021-10-27T18:06:53+5:30
Sameer Wankhede : कोऱ्या पेपरवर सह्या घेऊन खबऱ्याला बनवले पंच
नवी मुंबई : एनसीबीने खारघर येथे नायझेरियन विरोधात केलेली कारवाई बनावट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पंच शेखर कांबळे यांनी त्याचा उलगडा केला आहे. दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्याने आपल्या जीवाला धोका असून त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
आर्यन खान प्रकरणानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे. त्यांच्या टिमने खारघर येथे केलेल्या कारवाईत पंच म्हणून असलेल्या खबऱ्याने ती कारवाई बनावट असल्याचे म्हंटले आहे. समीर वानखेडे यांच्यासाठी खबऱ्याचे काम करणाऱ्या शेखर कांबळे यांनी त्याठिकाणी एक नायझेरियन व्यक्ती ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र कारवाईवेळी सदर नायझेरियन व्यक्तीने तिथून पळ काढला होता. यानंतर हे पथक एका ठिकाणी गेले असता, त्याठिकाणावरून दोन नायझेरियन व्यक्तींना पकडून एनसीबी कार्यालयात नेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कांबळे यांना कार्यालयात बोलावून पंच म्हणून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. यावेळी आपण कोऱ्या कागदावर सह्या घेत असल्याबाबत आक्षेप घेतला असता, काही होणार नाही याची हमी देण्यात आली होती. मात्र नुकतेच या कारवाईची माहिती उघड झाल्यानंतर पंच म्हणून आपला नोंदवलेला जबाब खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोणत्याही ड्रग्स शिवाय पकडलेल्या व्यक्तीकडे ६० ग्रॅम एमडी सापडल्याचा जबाब सही घेतलेल्या कोऱ्या कागदावर नोंदवण्यात आल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे.
हे प्रकरण उघडकीस येऊ लागल्याने मंगळवारी रात्री एनसीबी कार्यालयातून अनिल माने यांनी फोन करून आपल्याला भेटीसाठी बोलावल्याचेही सांगितले. मात्र कारवाईचा बनाव उघड झाल्याने आपल्या जीविताला भीती असल्याने एनसीबी कार्यालयात जायचे टाळले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कोपर खैरणे पोलीस ठाण्यात उपस्थित राहून त्यांनी पोलिसांकडे अर्ज दिला आहे. त्यामध्ये स्वतःला व कुटुंबाला पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
NCB विरोधात आणखी एक पंच समोर, केला गंभीर आरोप pic.twitter.com/ZXHT6KP00Z
— Lokmat (@lokmat) October 27, 2021
दहा ते बारा कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या.
खारघरच्या कारवाईच्या निमित्ताने आपल्याला एनसीबी कार्यालयात बोलवून घेतल्यानंतर त्याठिकाणी आपल्याकडून दहा ते बारा कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्याचे कांबळे यांनी सांगितले. त्यासाठी समीर वानखेडे व अनिल माने यांनी भाग पाडल्याचाही आरोप केला आहे. त्यापैकी एका कागदाचा वापर खारघच्या कारवाईसाठी झाला असून, इतर कागद देखील काही कारवाईसाठी पंच म्हणून वापरले गेले असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
NCB विरोधात आणखी एक पंच समोर, केला गंभीर आरोप pic.twitter.com/bbElg9PFXA
— Lokmat (@lokmat) October 27, 2021