VIDEO : समुद्रात बुडणाऱ्या पोलिसांना तस्करांनी वाचवले; पोलिसांनी 'आभार' मानले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 12:12 PM2019-10-07T12:12:54+5:302019-10-07T12:13:44+5:30

तस्करांनी पोलिसांची बोट बुडण्याचे पाहून बोटीचा वेग वाढवत पुढे निघून गेले. 

VIDEO: Smugglers rescued by drowning police in spanish sea; police said 'thank you' | VIDEO : समुद्रात बुडणाऱ्या पोलिसांना तस्करांनी वाचवले; पोलिसांनी 'आभार' मानले

VIDEO : समुद्रात बुडणाऱ्या पोलिसांना तस्करांनी वाचवले; पोलिसांनी 'आभार' मानले

googlenewsNext

स्पेनच्या दक्षिणेकडील समुद्रात शुक्रवारी हॉलिवूडच्या फिल्मला शोभेल अशी घटना घडली. स्पेनच्या तटरक्षक दलाच्या तीन पोलिसांनी तस्करांच्या बोटीचा पाठलाग सुरू केला. तस्कर पुढे तटरक्षक दलाचे पोलिस मागे मागे. अशा थरारक पाठलागावेळी पोलिसांची बोट तस्करांच्या बोटीला आदळली आणि पलटी झाली. तस्करांनी हे पाहून बोटीचा वेग वाढवत पुढे निघून गेले. 


तस्करांना वाटले की ते सुटले पण त्यांच्या डोक्यावर हेलिकॉप्टर घोंगावू लागले. हेलिकॉप्टरमध्ये तटरक्षक दलाची दुसरी टीम होती. त्यांनी ही घटना पाहिली होती. त्यांनी स्पीकरवरून पाण्यात पडलेल्या पोलिसांना वाचविण्याचे आवाहन तस्करांना केले. तस्करांनाही सुटकेचा मार्ग दिसत नव्हता, यामुळे त्यांनीही बोट अपघातस्थळाकडे वळविली. एकेक करून पाण्यात बुडणाऱ्या पोलिसांना त्यांनी बोटीवर घेतले. यामुळे या पोलिसांचे प्राण वाचले. पण पुढे जे घडले ते पाहून धक्का बसणारे आहे. 


तस्करांनी वाचविल्यानंतर पोलिसांनी त्यांचे आभार मानले आणि लगेचच हँड्स अप म्हणत अटक केली. यानंतर पोलिसांनी बोटीची तपासणी केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नशेचे पदार्थ आढळून आले. तस्करांनी हे पदार्थ कुठे कुठे पोहोचवण्यात येणार होते, ते सांगितले.



या सर्व घटनेचा व्हिडीओ हेलिकॉप्टरमधून रेकॉर्ड करण्यात आला. 
 

Web Title: VIDEO: Smugglers rescued by drowning police in spanish sea; police said 'thank you'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.