Video : ... म्हणून दुचाकीस्वाराला ट्राफिक पोलिसाने लावला रस्ता स्वच्छ करायला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 09:26 PM2020-05-12T21:26:10+5:302020-05-12T21:37:15+5:30
दुचाकीस्वार रस्त्यावर थुंकला होता म्हणून ट्राफिक पोलिसांनी त्याला ही अनोखी शिक्षा दिली.
चंदिगढ - चंदिगढमधील ट्रिब्यून चौकात एका नाक्यावर वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराला रस्ता स्वच्छ करायला सांगितला. कारण दुचाकीस्वार रस्त्यावर थुंकला होता म्हणून ट्राफिक पोलिसांनी त्याला ही अनोखी शिक्षा दिली.
ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, वाहतूक पोलीस बलदेव सिंग यांच्या निदर्शनास एक दुचाकीस्वार रस्त्यावर थुंकताना दिसला. त्यानंतर चेकपोस्टजवळ आल्यानंतर त्याला अडवलं आणि हाताने रस्त्यावर जिथे थुंकला होता ती जागा स्वच्छ करायला सांगितली. त्यानंतर दुचाकीस्वाराने जवळचं गवत घेऊन थुंकी पुसून काढली. याबाबतचा व्हिडीओ वायरल झाला असून सोशल मीडियावर दुचाकीस्वाराला ट्रोलही केलं जात आहे. वाहतूक पोलीस त्याच्याजवळ पाण्याची बाटली घेऊन गेले आणि हाताने ती जागा स्वच्छ धुवायला सांगितली.
दुचाकीस्वार रस्ता धुवत असताना एक पोलीस कर्मचारी म्हणाला, असं थुंकणं चांगलं आहे का, मुलांसोबत जात असताना इतकी मोठी चूक करताहात. याची मोठी शिक्षा आहे. असे कधीच करू नका. आम्ही इथे ड्युटी करतो आणि तुम्ही इथेच थुंकताय? अशी चूक पुन्हा करू नका. मी पाण्याची बाटली यासाठी सोबत घेऊन गेलो कारण ती व्यक्ती पाण्याने ती जागा स्वच्छ करू शकेल. पण त्याने गवताने फक्त पुसून काढलं. रस्त्यावरची थुंकी पुसायला त्याला कोणी जबरदस्ती केली नव्हती. तो स्वत:च पुढे आला होता असे वाहतूक पोलीस बलदेव सिंग यांनी सांगितलं.
#CoronavirusOutbreak | Man spits on Chandigarh road amid #coronavirus crisis, traffic marshal makes him clean it as punishmentpic.twitter.com/FeVzMfX7PH
— JioNews (@JioNews) May 12, 2020