Video : भरधाव कारचालकाची दुचाकीला धडक; दुचाकीवरील पती, पत्नी आणि चिमुकला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 09:21 PM2021-09-30T21:21:37+5:302021-09-30T21:22:27+5:30

Accident : अपघाताच्या वेळी चिमुकल्या मेहरान याला त्याची आई सदफ यांनी कवटाळून ठेवल्याने त्याला फक्त मुका मार लागला आहे

Video: Speed Car driver hits two-wheeler; Husband, wife and kid injured on the bike | Video : भरधाव कारचालकाची दुचाकीला धडक; दुचाकीवरील पती, पत्नी आणि चिमुकला जखमी

Video : भरधाव कारचालकाची दुचाकीला धडक; दुचाकीवरील पती, पत्नी आणि चिमुकला जखमी

Next
ठळक मुद्देया अपघातात मोहसीन हे त्यांची पत्नी सदफ आणि मुलगा मेहरान यांच्यासह खाली पडले. या अपघाताप्रकरणी कारचालक भारत हिंदुजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

अंबरनाथ : भरधाव कारचालकाने दुचाकीला धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा अंबरनाथमध्ये घडली. या अपघातात दुचाकीवरील पती, पत्नी आणि ३ वर्षीय चिमुकला हे जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली भवानी चौक परिसरात राहणारे मोहसीन मिस्त्री हे काल त्यांची पत्नी सदफ आणि ३ वर्षांचा मुलगा मेहरान यांच्यासह कल्याणला त्यांच्या सासुरवाडीला गेले होते. तिथून हे तिघेही दुचाकीवरून परतत होते. रात्री साडेबाराच्या सुमारास अंबरनाथच्या मटका चौक परिसरात ते आले असता रस्त्यावर स्पीड ब्रेकर आल्याने मोहसीन यांनी गाडीचा वेग कमी केला. मात्र याचवेळी त्यांच्या मागून भरधाव वेगात आलेल्या क्रेटा गाडीनं त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात मोहसीन हे त्यांची पत्नी सदफ आणि मुलगा मेहरान यांच्यासह खाली पडले. स्थानिकांनी तिथे धाव घेत या सर्वांना तातडीने उल्हासनगरच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या अपघातानंतर कारचालक हा तिथून पळून गेला. मात्र स्थानिकांनी त्याला पाठलाग करून फातिमा शाळेजवळ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातात सदफ यांच्या डोक्याला अंतर्गत दुखापत झाली असून मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर मोहसीन यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती क्रिटीकेअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रकाश कौरानी यांनी दिली आहे.

अपघाताच्या वेळी चिमुकल्या मेहरान याला त्याची आई सदफ यांनी कवटाळून ठेवल्याने त्याला फक्त मुका मार लागला आहे. या अपघाताप्रकरणी कारचालक भारत हिंदुजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या रक्ताचे नमुने सुद्धा तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांनी दिली आहे. 

Web Title: Video: Speed Car driver hits two-wheeler; Husband, wife and kid injured on the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.