Video : दिवाळी खरेदीच्या बहाण्याने चोरट्या महिलांचा सुळसुळाट; दोन घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 09:00 PM2018-11-03T21:00:57+5:302018-11-03T21:01:17+5:30
रट्या महिला चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाल्या असून या दोन्ही अज्ञात महिलांविरूध्द उल्हासनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने या चोरट्या महिलांचा शोध सुरु केला आहे.
ठाणे - दिवाळीच्या खरेदीचा बहाण्याने चोरट्या महिलांनी उल्हासनगर शहरात धुमाकूळ घातला आहे. अशा पुन्हा दोन घटना कॅम्प नं.१ व २ नंबर परिसरात उघडकीस आल्या आहे. उल्हासनगर येथे मोठी बाजारपेठ आहे. मात्र, यावेळी चोरट्या महिला चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाल्या असून या दोन्ही अज्ञात महिलांविरूध्द उल्हासनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने या चोरट्या महिलांचा शोध सुरु केला आहे.
एका घटनेत या चोरट्या महिलांनी उल्हासनगर शहरातील कॅम्प नं.१ येथील अमन टॉकीज रोड परिसरात लुक ब्युटी पार्लर जावून चोरी केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या दोघीही त्या पार्लरमध्ये सायंकाळच्या सुमारास गेल्या. त्यावेळी या २ अज्ञात महिलांनी पार्लरच्या काउंटरवर ठेवलेल्या कांता राजपूत आणि बावीश जयसिंगानी या दोघींच्या पर्समध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, लेडीज घडयाळ, गाडीच्या चाव्या, आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर वस्तू असा २२ हजाराचा मुद्देमाल लंपास करत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात २ अज्ञात महिलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निचीते करीत आहेत.
दुसऱ्या घटनेतही याच २ अज्ञात शहरातील कॅम्प नं. २ परिसरात सद्गुरु कलेक्शन या कपड्यांच्या दुकानात दिवाळीच्या खरेदीचा बहाणा करीत दुकानातील काउंटरवर ठेवलेल्या रेडिमेड कपडे हातचालीखीने लंपास करताना दुनाकातील सीसीटीव्हीत कैद झाल्या आहे. या दोन्ही चोरीच्या घटना उल्हासनगर पोलीस ठाण्यात घडल्या असून या चोरट्या महिलांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. दरम्यान, दिवाळीच्या खरेदीच्या बहाणा करीत या महिला दुकानात घुसून चोऱ्या करतील या भीतीने व्यापारी धस्तावले आहे.