सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचे होणार व्हिडीओग्राफी; पोलिसांनी दोनदा तपासला मृतदेह
By पूनम अपराज | Published: September 2, 2021 04:27 PM2021-09-02T16:27:29+5:302021-09-02T17:07:01+5:30
Siddharth Shukla passes away : याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पूनम अपराज
बिग बॉय फेम सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)आज आपल्यात नाही. गुरूवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्याची वयाच्या ४० व्या वर्षी प्राणज्योत मालवली. सिद्धार्थ शुक्लाच्या शरीरावर कोणतीही जखम आढळून आलेली नाही. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शुक्लाच्या निवासस्थानी तपासासाठी पोलिसांचे एक पथक उपस्थित असल्याची माहिती मुंबईपोलिसांनी दिली. कूपर रुग्णालयात सिद्धार्थचे शवविच्छेदन केले जाणार असून त्याची व्हिडीओग्राफी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच त्याचा व्हिसेरा सुद्धा जतन केला जाईल. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनाआधी पोलिसांनी दोनदा मृतदेहाची पडताळणी केली.
TV actor Siddharth Shukla passes away, say Mumbai Police pic.twitter.com/z1o3aESFP9
— ANI (@ANI) September 2, 2021
No injuries were sustained on the body of actor Siddharth Shukla. The cause of the death is yet to be ascertained. A team of police is present at the Shukla's residence for investigation: Mumbai Police
— ANI (@ANI) September 2, 2021
Actor Siddharth Shukla was brought dead to the hospital at 10.30 am. The cause of death is yet to be ascertained, says Mumbai's Cooper Hospital pic.twitter.com/KZO2k8MSPQ
— ANI (@ANI) September 2, 2021
बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाने जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 40 व्या वर्षी अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सोशल मीडियावर चाहत्यांसोबतच अनेक स्टार्स पोस्ट शेअर करून आणि दिवंगत अभिनेत्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करून आपले दुःख व्यक्त करत आहेत.
लोकांना विश्वास बसत नाही
मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्याला अंधेरीतील कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. कूपर हॉस्पिटलमध्ये सिद्धार्थच्या मृत्यूची चौकशी केल्यानंतर अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला होता, हे निष्पन्न झाले. हॉस्पिटलचे म्हणणे आहे की, त्याला उपचारासाठी आणण्यात आले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याची आई आणि दोन बहिणी घरात आहेत.
मुंबई पोलीस सिद्धार्थच्या मृत्यूच्या तपासात गुंतले आहेत
आता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक त्याच्या घरी पोहोचली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितले, सिद्धार्थ शुक्लाच्या शरीरावर कोणतीही जखम झालेली नाही. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तपासासाठी अभिनेत्याच्या घरी पोलिसांचे एक पथक उपस्थित आहे.
अभिनेत्याला सकाळी 10.30 वाजता रुग्णालयात नेण्यात आले
कूपर हॉस्पिटलच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन तीन डॉक्टरांचे पॅनल करणार आहे. डॉ. शिवकुमार पोस्टमार्टम करणार आहेत. पोलिसांनी एडीआरची नोंदणी केल्यानंतर रुग्णालय शवविच्छेदन करणार आहे.
गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाला कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे त्याचा ईसीजी प्रथम केला गेला. तो ईसीजी फ्लॅट ईसीजी आला. हॉस्पिटलचे म्हणणे आहे की, त्याला उपचारासाठी आणण्यात आले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
झोपण्यापूर्वी औषधं घेतले होते
सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं घेतल्याची माहिती मिळत आहे. जुहूतील CASUARINA-A या इमारतीच्या १२ व्य मजल्यावर सिद्धार्थ शुक्ला राहत होता. तर त्याच इमारतीत ६ व्य मजल्यावर त्याची आई राहत होती. मध्यरात्री ३ ते ३.३० च्या सुमारास सिद्धार्थला अस्वस्थ म्हणजेच छातीत दुखू लागल्याने त्याने आपल्या आईला १२ व्या मजल्यावर बोलावून घेतले होते. आई भेटून आल्यानंतर पुन्हा ६ व्या मजल्यावर आली. पोलिसांनी सिद्धार्थच्या शेजाऱ्यांची चौकशी केली असून पोलिसांनी सांगितले की, सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू संशयास्पद नाही. कुटुंब आणि पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.