Paytm चे फाऊंडर विजय शेखर शर्मांना झाली होती अटक, नंतर मिळाला जामीन, वाचा संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:45 AM2022-03-14T11:45:57+5:302022-03-14T11:46:11+5:30
पेटीएमचे फाऊंडर आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांना फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती अटक.
पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ (Paytm Founder and CEO) विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांना दक्षिण दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु नंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. समोर आलेल्या माहितीनुसार, विजय शेखर शर्मा यांच्या भरदाव वेगानं जाणाऱ्या जग्वार लँड रोव्हर कारने दक्षिण दिल्लीतील डीसीपींच्या कारला धडक दिली. इतकंच नाही, तर यानंतर ते आपली कार घेऊन घटनास्थळाहून निघून गेले होते.
यानंतर डीसीपींचे चालक दीपक कुमार यांनी या प्रकरणी FIR दाखल केली होती. या अपघातात त्यांना दुखापत जाली नाही. परंतु विजय शेखर शर्मा यांना वेगाने आणि निष्काळजीपणाने गाडी चालवण्याच्या आरोपाखाली २२ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधिकाऱ्यांनी गाडीच्या नंबरची नोंद केली होता. त्यानंतर त्या नंबरच्या आधारे पोलिसांनी गाडीचा शोध घेतला. तपासात ही गाडी एका कंपनीच्या नावे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या अपघाताच्या वेळी ग्रेटर कैलाश पार्ट २ मध्ये राहणारे विजय शेखर शर्मा गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर शर्मा यांना पोलीस स्थानकात बोलावण्यात आलं आणि त्यांना अटक करण्यात आली. परंतु त्यानंतर त्यांना जामिनही देण्यात आला.
Delhi | Vijay Shekhar Sharma, founder and CEO of Paytm, was arrested and later released on bail for ramming his car into the vehicle of DCP South in the month of February
— ANI (@ANI) March 13, 2022
विजय शेखर शर्मा हे पेटीएमचे संस्थापक आहेत. नुकतंच पेटीएमला रिझर्व्ह बँकेनंही झटका दिला होता. पेटीएम पेमेंट्स बँकेला कोणतेही नवे अकाऊंट उघडण्यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी यासंदर्भातील आदेश दिला. "बँकिंग नियम १९४९ च्या ३५ ए अंतर्गंत पेटीएम पेमेंट्स बँकेला नवे ग्राहक जोडण्यावर तात्काळ प्रभावानं बंदी घालण्यात आली आहे," असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं.