विजय सिंह मृत्यू प्रकरण : ‘त्या ’दोघांचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 09:44 PM2019-10-31T21:44:22+5:302019-10-31T21:46:03+5:30
विजय सिंह याच्या पोस्टमार्टम जे. जे. व केईएम रुग्णालयातून करण्यात येत आहे.
मुंबई - छेडछाड केल्याच्या कारणावरुन पोलिसांच्या मारहाणीतील विजय सिंह याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या प्रेमी युगलाचा पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, विजय सिंह याच्या पोस्टमार्टम जे. जे. व केईएम रुग्णालयातून करण्यात येत आहे. त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याचे पोलिसाांकडून सांगण्यात आले.
वडाळा टर्क टर्मिनस परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी अदखलप्राप्त गुन्हा दाखल झालेल्या विजय सिंह याचा मारहाणी मानसिक धक्का सहन न झाल्याने मृत्यू झाला. त्याला वेळेत उपचार न झाल्याने ही दुर्दवी घटना घडली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर दोघा अधिकाºयासह पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले. मात्र, खोटी तक्रार देणाऱ्या प्रेमी युगलाविरुद्ध कारवाईची मागणी मृताचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली. त्यानुसार देवेद्र दशरथ व आफरीन यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे घडलेल्या घटनेबाबत कसून चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सांगळे यांनी सांगितले.