बस चालकाला मारहाण करणाऱ्या त्या महिलेला अटक, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 02:17 PM2022-02-13T14:17:30+5:302022-02-13T14:28:18+5:30
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका महिलेने सरकारी बस चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. आता त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका महिलेने सरकारी बस चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. आता त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेचे नाव के. नंदिनी असे असुन ती २८ वर्षाची आहे.
ही महिला राँग साइडने जात असताना सरकारी बसने तिच्या स्कूटीला धडक दिली. या धडकेत महिलेल्या स्कूटीचे नुकसान झाले. त्यामुळे आपल्या स्कूटीची अशी अवस्था पाहून ती महिला संतापली. ती बसमध्ये चढली आणि थेट ड्रायव्हरची कॉलर पकडून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागली.
महिलेने ड्रायव्हरच्या शर्टाची कॉलर वेगाने ओढली. त्यावेळी ड्रायव्हरच्या शर्टाची सर्व बटणेही तुटली. महिलेला ड्रायव्हरला बाहेर ओढायचे होते, पण ड्रायव्हर स्वतःचा बचाव करत होता. यावेळी महिलेने बसमध्येच ड्रायव्हरला बेदम मारहाण केली.
कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. जेव्हा हा व्हिडिओ विजयवाडा पोलिसांपर्यंत पोहोचला, तेव्हा पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
#FireFiresTheFire: A woman attacked @apsrtc city bus driver indiscriminately in #Vijayawada complaining that the bus had hit her scooty.
— Phanindra Papasani (@PhanindraP_TNIE) February 9, 2022
She is driving scooter in wrong direction.@VjaCityPolice filed a case against her.#AndhraPradesh@APPOLICE100pic.twitter.com/3Se1Uavjsp