ठेकेदाराकडून ५० हजाराची लाच मागणारा ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

By Appasaheb.patil | Published: November 29, 2022 03:07 PM2022-11-29T15:07:18+5:302022-11-29T15:18:16+5:30

Crime News: १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे जिल्हा परिषद शेषनिधी अंतर्गत केलेल्या कामाच्या बीला संदर्भात पाठपुरावा करणाऱ्या ठेकेदाराकडून ५० हजाराची लाच मागणाऱ्या  बोराळे ( ता मंगळवेढा) येथील ग्रामविकास अधिकारी गोपीचंद दादा गवळी, (वय-५६ वर्षे) हा  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद सापडला आहे  

Village development officer who demanded a bribe of 50,000 from the contractor in the net of bribery | ठेकेदाराकडून ५० हजाराची लाच मागणारा ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

ठेकेदाराकडून ५० हजाराची लाच मागणारा ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

googlenewsNext

मंगळवेढा - १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे जिल्हा परिषद शेषनिधी अंतर्गत केलेल्या कामाच्या बीला संदर्भात पाठपुरावा करणाऱ्या ठेकेदाराकडून ५० हजाराची लाच मागणाऱ्या  बोराळे ( ता मंगळवेढा) येथील ग्रामविकास अधिकारी गोपीचंद दादा गवळी, (वय-५६ वर्षे) हा  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद सापडला आहे  याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे

यातील तक्रारदार यांचे मित्र हे कॉन्ट्रक्टर असुन त्या मित्रानी  बोराळे, ता. मंगळवेढा येथे शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे जिल्हा परिषद शेष निधी अंतर्गत केलेल्या कामाच्या बीला संदर्भात तक्रारदार पाठपुरावा करीत होते. सदर कामाच्या बीलाची रक्कम खात्यात जमा केली बाबत ग्रामसेवक . गोपीचंद गवळी यांनी तक्रारदार यांच्याकडे बक्षिस / मोबदला म्हणून १ लाख रुपयांची लाचेची मागणी करुन पहिला हप्ता ५० हजार रुपये मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले आहे

याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी गोपीचंद दादा गवळी यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे  पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस हवालदार प्रमोद पकाले,उमेश पवार, स्वप्निल राणके, शाम सुरवसे यांच्या टीमने केली आहे.

Web Title: Village development officer who demanded a bribe of 50,000 from the contractor in the net of bribery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.