Deepali Chavan Suicide: विनोद शिवकुमार दारू ढोसून झोडायचा ‘मटण पार्टी’; साधे जेवण दिल्यावर करायचा चिडचिड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 09:52 AM2021-03-31T09:52:51+5:302021-03-31T11:06:00+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या कुठल्याही विश्रामगृह किंवा संकुलात मांसाहारी जेवणावर पूर्णत: बंदी आहे. तो एक मोठा गुन्हा असताना, निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा हट्ट हा मटणाचे जेवण व दारू यासाठीच असायचा. 

Vinod Shivkumar's 'Mutton Party' | Deepali Chavan Suicide: विनोद शिवकुमार दारू ढोसून झोडायचा ‘मटण पार्टी’; साधे जेवण दिल्यावर करायचा चिडचिड

Deepali Chavan Suicide: विनोद शिवकुमार दारू ढोसून झोडायचा ‘मटण पार्टी’; साधे जेवण दिल्यावर करायचा चिडचिड

Next

- नरेंद्र जावरे 
परतवाडा (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या कुठल्याही विश्रामगृह किंवा संकुलात मांसाहारी जेवणावर पूर्णत: बंदी आहे. तो एक मोठा गुन्हा असताना, निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा हट्ट हा मटणाचे जेवण व दारू यासाठीच असायचा. साधे जेवण दिल्यास त्याच्याकडून कर्मचाऱ्यांना उर्मट व अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची चर्चा पुढे आली आहे.

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी असलेला शिवकुमार याचे एकापेक्षा एक सुरस किस्से आता बाहेर येऊ लागले आहेत. कालपर्यंत दहशतीखाली असलेले कर्मचारी बोलू लागले आहेत.  त्याच्या जेवणाच्या फर्माईशीवर कालपर्यंत कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात असलेली चर्चा आता बाहेर येऊ लागली आहे.

विश्रामगृह, कोअर क्षेत्रातील कॅम्पवर मटण पार्टी
शिवकुमार हा वनमजूर, वनकर्मचाऱ्यांकडून मटणाचे जेवण बनवून घेत होता. सर्व नियम धाब्यावर बसवून दौऱ्यादरम्यान दारू ढोसत होता. हुकूमशाही गाजवायचा. उर्मट शैली व दंडेलीच्या प्रवृत्तीमुळे वनमजूर, वनकर्मचारी, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर त्याची दहशत होती. 

पोलीस कोठडीत पंखा, बरमुडा, मटणाची सुविधा
आरोपी शिवकुमार हा धारणी पोलीस ठाण्याच्या कोठडीत चार दिवस होता. या चार दिवसांत त्याला पोलिसांनी पंखा, बरमुडा, मटणाची सुविधा कोणाच्या ‘आशीर्वादा’ने दिली, असा सवाल भाजपच्या जिल्हा अध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी मंगळवारी अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयात हल्लाबोल आंदोलनात उपस्थित केला. मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या व वरिष्ठांशी संवाद साधला.

Web Title: Vinod Shivkumar's 'Mutton Party'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.