जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणांवर साताऱ्यात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 10:58 PM2022-02-03T22:58:23+5:302022-02-03T22:59:23+5:30

सरकारने घेतलेल्या वाईनच्या बाबतीतल्या निर्णयावर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने होत असताना पहायला मिळत आहेत.

violation of the curfew order crime in satara against 125 people including bandatatya karadkar | जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणांवर साताऱ्यात गुन्हा

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणांवर साताऱ्यात गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सरकारने घेतलेल्या वाईनच्या बाबतीतल्या निर्णयावर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने होत असताना पहायला मिळत असून. गुरुवारी साताऱ्यात बंडातात्या कऱ्हाडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे दंडवत आणि दंडूका असे आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकार्यालय समोर प्रचंड गर्दी जमली होती. त्या सर्वांनी कोरोना नियमाचे उल्लंघन केले. यामुळे पोलिसांनी प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडा तात्या कराडकर, विकास शंकर जवळ, मनोज निंबाळकर यांच्यासह १२५  जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  साथरोग अधिनियमन ३ तसेच १८८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) व १३५ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाना साधत अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली होती. यासंदर्भात मात्र सातारा शहर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.
 

Web Title: violation of the curfew order crime in satara against 125 people including bandatatya karadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.