खेड शिवापूर येथे अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलेस अमानुष मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 07:05 PM2018-12-19T19:05:15+5:302018-12-19T19:11:25+5:30

प्रत्येक वेळी या महिलेच्या अंगात कुलदैवत आणण्यासाठी कोंडे आणि त्याची पत्नी या पीडित महिलेला वेताची काठी आणि आसुडाने अमानुष मारहाण करत होते.

violence with women in the name of superstition in Khed Shivapur | खेड शिवापूर येथे अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलेस अमानुष मारहाण 

खेड शिवापूर येथे अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलेस अमानुष मारहाण 

googlenewsNext
ठळक मुद्देएकास अटक : अंगात दैवीशक्ती आणण्यासाठी छळ पीडित महिलेची सासू आणि दीर यांच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल

खेड शिवापूर : अंगात दैवीशक्ती आणण्यासाठी कथित भगत व सासरच्या मंडळींकडून महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्याचा प्रकार आर्वी (ता. हवेली) येथे झाला आहे. राजगड पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणारा भगत राजू कोंडे, त्याची पत्नी, पीडित महिलेची सासू आणि दीर यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव आणि राज्य सचिव मिलिंद देशमुख यांनी पुढाकार घेतला.एका विवाहित महिलेच्या अंगात दैवीशक्ती आणण्यासाठी तिच्या सासरचे लोक तिला आर्वी येथील राजू कोंडे या भगताकडे वारंवार घेऊन येत होते. प्रत्येक वेळी या महिलेच्या अंगात कुलदैवत आणण्यासाठी कोंडे आणि त्याची पत्नी या पीडित महिलेला वेताची काठी आणि आसुडाने अमानुष मारहाण करत होते. या प्रकाराबद्दल या महिलेच्या माहेरच्या लोकांना समजले. त्यानंतर त्यांनी या पीडित महिलेला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्यानंतर ‘अंनिस’च्या पुढाकाराने या पीडित महिलेच्या नातेवाइकांकडून राजगड पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार राजगड पोलिसांनी सदर भगत राजू कोंडे, त्याची बायको, या पीडित महिलेची सासू आणि दीर यांच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. कोळवडी येथील दादासो विठोबा यांना अटक करण्यात आली आहे. राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दरडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीसअधिकारी पुढील तपास करत आहेत.

Web Title: violence with women in the name of superstition in Khed Shivapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.