सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा! मुंब्रामध्ये कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 10:45 PM2020-04-15T22:45:50+5:302020-04-15T23:05:11+5:30

दोघांवर भादंवि कलम अंतर्गत तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये  मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Voiletion of Social Distancing! A case has been registered against both for allegedly intimidating employees in Mumbra pda | सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा! मुंब्रामध्ये कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा! मुंब्रामध्ये कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देअब्दुल गणी ऊर्फ मर्चट व डॉ .एस .एफ रजा यांनी कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळी करुन धक्काबुकी केली.कलम 188 . 279 , 270 , 323 , 353 , 504 , 506 , 34  भादंवि सह संसर्गजन्य रोग प्रतबंधात्मक  कायदा कलम तीन अन्वये मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्राः  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत  सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंब्रामधील दोघांवर भादंवि कलम अंतर्गत तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये  मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्रामध्ये कौसा, चाँदनगर परिसरात कोरोना विषाणुबाबत जनजागृती करण्यासाठी खाजगी वाहनावर मनपाचे वाहनाचे स्टीकर लावुन लोकांना सुचना ऐकु जाव्यात म्हणून  स्पीकर लावुन लोकांनी रस्त्यात गर्दी करु नये, आवश्यकतेशिवाय घरा बाहेर पडू नये, नाका तोंडास मास  लावणे आदी सूचना देत कर्मचारी गस्त घालण्यासाठी फिरत होते. 
       
 यावेळी दौलतनगर नाका चाँदनगर येथे गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकांची गर्दी दिसुन आली. कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ येथील नागरिकांना त्याठिकाणहून आवश्यकता शिवाय न थांबता घरी निघुन जावे, गर्दी केल्याने संसर्गजन्य रोगाचा फैलाव होवू शकतो याबाबतची माहिती दिली, परंतु अब्दुल गणी ऊर्फ मर्चट व डॉ .एस .एफ रजा यांनी कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळी करुन धक्काबुकी केली.

दरम्यान शासकीय कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या कारणस्तव अब्दुल गणी ऊर्फ मर्चट व डॉ .एस .एफ रजा या दोघांवर संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा 1897 लागु असताना त्याचा भंग केल्यामुळे भादवि  269 , 270 अन्वये तसेच मा. आयुक्त यांचेकडील सीआरपीसी 144 ( 1 ) ( 3 ) कडील मनाई आदेशाचा भंग केला म्हणुन कलम 188 . 279 , 270 , 323 , 353 , 504 , 506 , 34  भादंवि सह संसर्गजन्य रोग प्रतबंधात्मक  कायदा कलम तीन अन्वये मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Voiletion of Social Distancing! A case has been registered against both for allegedly intimidating employees in Mumbra pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.