वडाळ्यात भरदिवसा दरोडा; काजल ज्वेलर्समधून लुटले २ कोटी
By पूनम अपराज | Published: October 11, 2018 08:27 PM2018-10-11T20:27:56+5:302018-10-11T20:28:38+5:30
मात्र चलाख चोरांनी सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन पाठविल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा शोध घेत आहेत.
मुंबई - वडाळा मोनो रेल्वे स्थानकानजीक असलेल्या सायन म्हाडा कॉलनी परिसरातील काजल ज्वेलर्स हे सराफाचे दुकान आज दुपारी दुकानाचे मालक जेवणासाठी दुकान बंद करून गेले असताना दरोडेखोरांनी काजल ज्वेलर्समधून सोन्याचे - चांदीचे दागिने लुटले आहेत. अंदाजे या दागिन्यांची किंमत २ कोटी असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र मंदावर यांचे काजल ज्वेलर्स नावाचे सोन्या - चांदीच्या दागिन्यांचे दुकान वडाळा परिसरात आहे. आज दुपारी २. ३० वाजताच्या सुमारास दुकान दुपारच्या जेवणासाठी बंद करण्यात आले आणि महेंद्र दुपारच्या जेवणासाठी गेले असताना चोरट्यांनी डाव साथत दुकान लुटले. दुपारी ३. ३० वाजताच्या सुमारास महेंद्र दुकानात परत आल्यानंतर त्यांना दुकानातील सामान अस्तावस्त पडलेले आढळले. त्यावेळी त्यांना दुकानातील दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलाविले. मात्र चलाख चोरांनी सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन पाठविल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा शोध घेत आहेत.