Walmik Karad :अखेर वाल्मिक कराड पुण्यात CID समोर शरण; तत्पूर्वी Video जारी करत म्हणाला... तर शिक्षा भोगायला तयार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:40 IST2024-12-31T12:24:25+5:302024-12-31T12:40:06+5:30

Santosh Deshmukh Case Update : मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सीआयडीने मोठी कारवाई केली आहे.

Walmik Karad Surrender News : Finally Valmik Karad surrenders before CID in Pune Santosh Deshmukh Case Update; Earlier, he released a video and said... ready to face punishment | Walmik Karad :अखेर वाल्मिक कराड पुण्यात CID समोर शरण; तत्पूर्वी Video जारी करत म्हणाला... तर शिक्षा भोगायला तयार 

Walmik Karad :अखेर वाल्मिक कराड पुण्यात CID समोर शरण; तत्पूर्वी Video जारी करत म्हणाला... तर शिक्षा भोगायला तयार 

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण आला आहे. यामुळे पुण्यातील CID मुख्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसेच मुख्यालय परिसरात धनंजय मुंडे समर्थकही जमू लागले होते. 

मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सीआयडीने मोठी कारवाई केली आहे. सीआयडीने सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. अशातच भाजपाचे आमदार सुरेश धस हे मुंडेंवर वेगवेगळे खुलासे करत असून विरोधकांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंडे यांच्यात बैठक झाली असून यात कराडच्या शरण येण्यावर निर्णय झाल्याचे समजते आहे. 

वाल्मिक कराड आज पुण्यात शरण आला. CID ची पथके मागील पंधरा दिवसापासून वाल्मिकी कराड यांचा शोध घेत आहेत. परंतू तो त्यांना सापडू शकला नव्हता. वाल्मिक कराडच्या शेवटच्या लोकेशनबाबत मोठी अपडेट समोर आली होती. कराड याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होते, यानंतर त्याचा फोन बंद असल्याचे समोर आले आहे. परंतू, तो त्याच्या आकांसोबत टचमध्ये असल्याचा दावा धस यांनी केला होता. सरेंडर करण्यावरून या दोघांमध्ये वादही झाल्याचे ते म्हणाले होते. 

सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे कराड याने स्पष्ट केले आहे. 

Web Title: Walmik Karad Surrender News : Finally Valmik Karad surrenders before CID in Pune Santosh Deshmukh Case Update; Earlier, he released a video and said... ready to face punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.