कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक
By पूनम अपराज | Published: March 2, 2021 04:20 PM2021-03-02T16:20:33+5:302021-03-02T16:21:21+5:30
Molestation of a women in KDMC Jumbo COVID Centre Kalyan : याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.
कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका महिलेचा वार्डबॉयने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. वाढत्या कोरोना रुग्णामुळे कल्याण पश्चिम येथील लाल चौकी परिसरातील आर्ट गॅलरीत जंबो कोविड सेंटर पालिकेने पुन्हा सुरू केले. कोविड सेंटरमध्ये दोन दिवसापूर्वी प्रसूती झालेली एक महिला ही कोविड पॉझिटीव्ह झाल्याने उपचारासाठी दाखल झाली. या महिलेचा सेंटरमधील एका कर्मचाऱ्याने विनयभंग केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.
Thane: A ward boy at KDMC COVID Centre, Kalyan arrested for allegedly molesting a female patient on 28th February; Case registered at Bazarpeth Police Station, Kalyan, say police
— ANI (@ANI) March 2, 2021
महिलेने घडलेला सगळा प्रकार महिला डॉक्टरसह तिच्या पतीला फोनवर कळविला. समाजसेवक अजय सावंत यांच्या पुढाकाराने हे प्रकरण बाजारपेठ पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. श्रीकांत मोहिते असे या वार्डबॉयचे नाव असून तो खाजगी वार्डबॉय असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व प्रकाराबाबत महिलेच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मोहितेला अटक केली आहे.