आर्वीतील रुग्णालयात शासकीय गोळ्यांचं भांडार; पापाचं गर्भगृह पाहून पोलिसांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 09:45 AM2022-01-17T09:45:25+5:302022-01-17T09:45:45+5:30

गर्भगृहात आणखी काय दडलेले आहे, याचा शोध  सुरू

wardha abortion case Government pills found in hospital | आर्वीतील रुग्णालयात शासकीय गोळ्यांचं भांडार; पापाचं गर्भगृह पाहून पोलिसांना धक्का

आर्वीतील रुग्णालयात शासकीय गोळ्यांचं भांडार; पापाचं गर्भगृह पाहून पोलिसांना धक्का

Next

- चैतन्य जोशी 

वर्धा : कदम रुग्णालयात आरोग्य विभागाच्या टास्क फोर्ससह पोलिसांनी पापाच्या गर्भगृहाची सखोल तपासणी केली असता तब्बल ७१ हजार ७६४ मुदतबाह्य झालेल्या शासकीय गोळ्या आढळून आल्या. गर्भगृहात आणखी काय दडलेले आहे, याचा शोध  सुरू आहे.

७ सदस्यीय पथकाने कदम रुग्णालयाची तपासणी केली. त्यादरम्यान मालाईन टॅबलेट, ऑक्सिटोन इंजेक्शनसह इतर मुदतबाह्य औषधी सापडल्या. यापूर्वीही डॉ. कदम यांना औषधांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. ते सर्व मुदतबाह्य औषध जप्त करण्यात आले आहे.
डॉ. मोहन सुटे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय आर्वी.

डॉ. नीलम गोऱ्हे यांची गृहमंत्र्यांशी चर्चा
नागपूर : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी चर्चा करून गर्भपाताच्या इंजेक्शनची रसद मिळत असताना त्याकडे कानाडोळा झाला का, तसेच यात कुणाचे लागेबांधे आहेत ते समोर यावे, अशी मागणी केली आहे. निर्दोष पद्धतीने चार्जशीट तयार व्हावी, अशी अपेक्षाही गृहमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. सर्व काही तसेच होईल, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

स्वत:च लावायचे ‘बायो मेडिकल वेस्ट’ची विल्हेवाट!
वर्धा : ‘बायो मेडिकल वेस्ट’ची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी, असे प्रदूषण नियंत्रण अधिनियमात नमूद करण्यात आले आहे. परंतु, कदम हॉस्पिटल बायो मेडिकल वेस्टची स्वत:च विल्हेवाट लावत होते. 
वर्धा जिल्ह्यासाठीच्या अधिकृत नागपूर येथील एजन्सीकडे १० ऑगस्टला हॉस्पिटलने बायो मेडिकल वेस्ट देण्यासाठी नोंदणी केली. मात्र, सहा महिन्यांत हॉस्पिटलने नागपूरच्या एजन्सीला बायो मेडिकल वेस्ट दिलेच नसल्याचे सुपर हायजेनिंग डिस्पोझलचे रबी सिंग यांनी सांगितले.

Web Title: wardha abortion case Government pills found in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.