सावधान... टिंडरवर भेटले, महिनाभर फिरले अन् 'ती' रात्र संपताच त्याने तिला सोडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 02:51 PM2019-06-18T14:51:34+5:302019-06-18T14:53:08+5:30

या तरुणीने डेट करणाऱ्या तरुणाविरोधात शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करून त्यानंतर ब्रेक अप केल्याचा आरोप केला आहे. 

WARNING ... met on the tinder, walked for a month, and he left her when finished the night! | सावधान... टिंडरवर भेटले, महिनाभर फिरले अन् 'ती' रात्र संपताच त्याने तिला सोडले!

सावधान... टिंडरवर भेटले, महिनाभर फिरले अन् 'ती' रात्र संपताच त्याने तिला सोडले!

Next
ठळक मुद्दे एका खाजगी कंपनीत काम करणारी २९ वर्षीय तरुणाने टिंडर या डेटिंग अ‍ॅपमार्फत एका तरुणीशी डेट करण्यास सुरुवात केली. तरुणी देखील एका टेक कंपनीत काम करणारी आहे.

कर्नाटक - सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला मुलगा आणि मुलगी टिंडर या डेटिंग अ‍ॅपवरून एकमेकांना भेटले. मात्र, या दोघांच्या लव्ह स्टोरीचा लवकरच खूप वाईट शेवट झाला. एका खाजगी कंपनीत काम करणारी २९ वर्षीय तरुणाने टिंडर या डेटिंग अ‍ॅपमार्फत एका तरुणीशी डेट करण्यास सुरुवात केली. तरुणी देखील एका टेक कंपनीत काम करणारी आहे. या तरुणीने डेट करणाऱ्या तरुणाविरोधात शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करून त्यानंतर ब्रेक अप केल्याचा आरोप केला आहे. 

दोघांनी एक महिनाभर एकमेकांना डेट करून भेटत होते. मात्र, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर २४ तासात तरुणाने तरुणीशी असलेले संबंध तोडू पाहत होता तर तरुणी मात्र चांगले प्रेमसंबंध जोडण्याची सुरुवात समजत होती. ज्यावेळी तरुणाने तरुणीला हे संबंध पुढे ठेवायचे नसल्याचे सांगितले. त्यावेळी तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्तीने केल्याचा आरोप केला आहे. दाखल तक्रारीनुसार, ३ जूनला तरुणीने तरुणीला आयएएस कॉलनीतील हरिहर एनक्लेव्हमधील आपल्या अपार्टमेंटमध्ये बोलाविले होते. त्यावेळी तरुणीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तरुणाने जबरदस्ती केली. दुसऱ्या दिवशी तरुणीने तरुणाला कॉल केला आणि लग्नासाठी मागणी घातली. मात्र, तरुणाने तिला तिच्याशी लग्न करायचे नसल्याचं सांगत ब्रेक - अप केलं. 

Web Title: WARNING ... met on the tinder, walked for a month, and he left her when finished the night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.