गांजा प्रकरणात ओडिशातील मुकुंद जेना याच्याविरुध्द फेर अटक वॉरन्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:59 PM2019-05-29T17:59:04+5:302019-05-29T18:00:38+5:30
शासनातर्फे सरकारी वकील सुभाष देसाई हे बाजू मांडत आहेत.
मडगाव - गांजा प्रकरणात संशयित मुकुंद जेना (६२) याच्याविरुध्द फेर अटक वॉरन्ट जारी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जून पासून होणार आहे. म्हापसा येथील एन.डी.पी.एस न्यायालयात आता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
१२ जूलै २0१७ रोजी संशयित मुकुंद जेना याला दाबोळी विमानळ परिसरात वास्को पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जेना हा मूळ ओडिशा राज्यातील आहे. तो दाबोळी विमानतळ परिसरात कामगार तथा कत्रांटदार म्हणून काम करीत होता. पोलीस उपनिरीक्षक नेहंदा तावारीस यांनी चार लाख रुपये किंमतीचा चार किलो गांजा बेकायदा बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर संशयित फरार झाला होता. वास्को पोलीस त्याचा शोध घेत आहे. संशयिताच्या गैरहजेरीमुळे हा खटला बराच काळ रेंगाळत आहे. शासनातर्फे सरकारी वकील सुभाष देसाई हे बाजू मांडत आहेत.