मित्रासोबत करत होती पार्टी, विवस्त्रावस्थेत सातव्या मजल्यावरून खाली पडली तरुणी, धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 16:56 IST2021-12-19T16:56:30+5:302021-12-19T16:56:38+5:30
Crime News: उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये एक २४ वर्षांची सातव्या मजल्यावरून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीला गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मित्रासोबत करत होती पार्टी, विवस्त्रावस्थेत सातव्या मजल्यावरून खाली पडली तरुणी, धक्कादायक कारण आलं समोर
ग्रेटर नोएडा - उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये एक २४ वर्षांची सातव्या मजल्यावरून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीला गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून, की सध्या कोमामध्ये आहे. जेव्हा ही तरुणी फ्लॅटच्या खिडकीमधून खाली पडली. तेव्हा ती निर्वस्त्रावस्थेत होती. याची माहिती मिळताच पोलिसांन घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी मुळची पश्चिम बंगालमधील रहिवासी होती. ती हरियाणामधील पानिपत येथे वास्तव्यास होती. ती १२ डिसेंबर रोजी ग्रेटन नोएडामध्ये तिच्या मित्राला भेटण्यासाठी आली होती. मध्यरात्रीच्या सुमारास ही तरुणी अचानक सातव्या मजल्यावरून अचानक खाली पडली. जखमी तरुणीला पोलिसांनी रुग्णालयात नेले. प्राथमिक तपासामध्ये सदर तरुणी ही झोप आणि नशेत असल्याने खिडकीतून खाली पडली, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी सदर तरुणीच्या नातेवाईकांना सूचना दिली आहे. मात्र आतापर्यंत कुणीही सदर तरुणीची चौकशी करण्यासाठी आलेला नाही. दरम्यान, सदर तरुणीच्या मित्राची चौकशी केली असता त्याने सांगितले की, या तरुणीसोबत त्याची भेट नियमितपणे व्हायची. तसेच ती जेव्हा यायची तेव्हा त्याच्याच फ्लॅटमध्ये राहायची.
दरम्यान, सदर तरुणीच्या मित्राने सांगितले की, ज्या दिवशी ही घटना घडली, त्या रात्री दोघांनीही पार्टी केली होती. तसेच मध्यरात्री जेव्हा सदर तरुणी बाथरूममध्ये गेली तेव्हा ती खिडकीमधून खाली पडली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तसेच रुग्णालयामध्ये सदर तरुणी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.