गाडी चालवतानाही मोबाइलप्रेम सुटेना; आठ महिन्यांत १५ हजार जणांना दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 10:42 AM2022-09-16T10:42:59+5:302022-09-16T10:43:43+5:30

दुचाकीवर तीन सीट बसविल्यास तसेच विनाहेल्मेट गाडी चालविल्यास एक हजार रुपये दंड आकारला जातो तसेच चालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाते.

Watch mobile even while driving; 15 thousand people fined in eight months | गाडी चालवतानाही मोबाइलप्रेम सुटेना; आठ महिन्यांत १५ हजार जणांना दंड

गाडी चालवतानाही मोबाइलप्रेम सुटेना; आठ महिन्यांत १५ हजार जणांना दंड

Next

मुंबई : सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार गाडी चालविताना मोबाइलवर बोलल्यास दुचाकीस्वाराला १ हजार रुपये तर मोठ्या गाड्यांच्या चालकांना ४ हजार रुपयांचा दंड आकारला जातो. दंडाची रक्कम वाढवूनही वाहनचालकांमध्ये तसूभरही फरक पडलेला नसल्याचे आढळून आले आहे. मोबाइलवर बोलत गाडी चालविणाऱ्या १५,१६५ जणांवर जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत कारवाई करण्यात आली आहे. 

दुचाकीवर तीन सीट बसविल्यास तसेच विनाहेल्मेट गाडी चालविल्यास एक हजार रुपये दंड आकारला जातो तसेच चालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाते. अतिवेगाने गाडी चालविण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली, दुचाकीवरून अतिरिक्त प्रवासी वाहतूक इत्यादी गैरप्रकारांसाठी केंद्राने दंडाच्या रकमेत पाच ते दहा पटीने वाढ केली आहे. परंतु असे असूनही वाहनचालकांमध्ये बेशिस्तपणा आढळून येत आहे. 

मोबाइलवरील बोलणे कॅमेऱ्यात कैद
बरेच वाहनचालक वाहन चालवताना बिनधास्तपणे मोबाइलवर बोलतात. काही ठिकाणी पोलीस नाहीत असे वाटते तर काही ठिकाणी वाहतूक पोलीस दिसले की, मोबाइल काढून खिशात ठेवतात, नंतर पुढे गेले की लगेच मोबाइलवर बोलणे सुरू होते. त्यामुळे कारवाईतून आपली सुटका झाली असा वाहनधारकांचा समज असतो. मात्र, प्रत्यक्षात तसे नसते. तुम्हांला आता न अडविताही मोबाइल कॅमेऱ्यातून पोलीस कैद करू शकतात. तसे प्रकार आता होऊ लागले आहेत.

हेल्मेटचा नियम नावालाच
हेल्मेट न वापरणाऱ्या ८ लाख ८८हजार ५४८वाहनधारकांवर जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ४४ कोटी ४२ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कोणत्या प्रकारात किती दंड वसुली?
विना हेल्मेट दुचाकी चालविणे : ४,७०,७९,००० रु.
सीट बेल्टचा वापर न करणे : ७८,८३,१०० रु.
वाहन चालवताना मोबाइलचा वापर : ३४,८२,५०० रु.

कोणत्या वाहनाला किती दंड
दुचाकी /तीन चाकी - १००० रु.
चारचाकी वाहने - २००० रु.
मोठी वाहने (ट्रक) - ४००० रु.

Web Title: Watch mobile even while driving; 15 thousand people fined in eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.