चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहताय? सावधान! ‘त्या’ १ लाख जणांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 08:22 AM2023-03-02T08:22:37+5:302023-03-02T08:22:54+5:30

अमेरिकेतील नॅशनल एजन्सी फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉईटेड चिल्ड्रन (एनसीएमईसी) या यंत्रणेने चाईल्ड पोर्नोग्राफीबद्दलचा एक अहवाल तयार करून तो  भारतासह अनेक देशांना वितरित केला आहे.

Watching child pornography? Beware! Action will be taken against 'those' 1 lakh people | चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहताय? सावधान! ‘त्या’ १ लाख जणांवर होणार कारवाई

चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहताय? सावधान! ‘त्या’ १ लाख जणांवर होणार कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात इंटरनेटच्या माध्यमातून बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या (चाईल्ड पॉर्नोग्राफी) सुमारे एक लाख आरोपींची तपास यंत्रणांनी ओळख पटविली असून त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत त्यातील काही हजार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

अमेरिकेतील नॅशनल एजन्सी फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉईटेड चिल्ड्रन (एनसीएमईसी) या यंत्रणेने चाईल्ड पोर्नोग्राफीबद्दलचा एक अहवाल तयार करून तो  भारतासह अनेक देशांना वितरित केला आहे. त्यातील माहिती व देशभरात पॉर्नोग्राफी प्रकरणांवर ठेवण्यात येणारे बारीक लक्ष याद्वारे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मध्य प्रदेशात चाईल्ड पोर्नोग्राफीच्या गुन्ह्यांत ३० हजार आरोपी गुंतले आहेत. त्यांनी अशा प्रकारचे व्हिडीओ अनेकांना पाठविले आहेत. त्यातील चार हजार आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. छत्तीसगढमध्ये ३२०० आरोपींची ओळख पटविण्यात आली आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या गुन्ह्यांत राजस्थानमध्ये ८५० आरोपींना अटक झाली आहे. (वृत्तसंस्था)

कसे चालते काम?
इंटरनेटद्वारे चाईल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ वितरित करणाऱ्यांची माहिती अमेरिकेतील एनसीएमईसी ही यंत्रणा गोळा करते. ती माहिती देशोदेशीच्या तपास यंत्रणांना दिली जाते. त्याची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर तपास यंत्रणा आरोपींना अटक करतात. 

बालकांच्या लैंगिक शोषण घटनांत ३१ टक्के वाढ
n तीन वर्षांत बालकांच्या लैंगिक शोषणाचे ४ लाख गुन्हे नोंद.
n पॉक्सो कायद्याच्या अन्वये १,३४,३८३ गुन्ह्यांची नोंद झाली.
n २०२० साली बालकांच्या लैंगिक शोषणाची ४७,२२१ गुन्हे नोंदले गेले.
n बालकांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांत ३१ टक्के वाढ झाली आहे. 
पाच वर्षांपर्यंतचा कारावास
चाईल्ड पॉर्नोग्राफीचा व्हिडीओ फॉडवर्ड केला तर पाच वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.

Web Title: Watching child pornography? Beware! Action will be taken against 'those' 1 lakh people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.