... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 18:56 IST2020-06-12T18:51:50+5:302020-06-12T18:56:42+5:30
या संपूर्ण प्रकरणाबाबत ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांच्या फिर्यादीवरून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणात तपास सुरू केला आहे.

... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन
रोहतक - वडिलांच्या मृत्यूनंतर आठ वर्ष एका मुलाने वडिलांच्या नावावर बोगस कागदपत्रं देऊन सरकारकडून पेन्शन उकळली. याबाबत अधिकाऱ्यांना सुगावा देखील लागला नाही. जेव्हा अधिकाऱ्यांना हा फसवणुकीचा प्रकार समजला तोपर्यंत आरोपीने सरकारला सुमारे 92.61 लाख रुपयांचा चुना लावला होता. या संपूर्ण प्रकरणाबाबत ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांच्या फिर्यादीवरून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणात तपास सुरू केला आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी ए.एसी. बहरा यांच्या निधनानंतरही त्यांचा मुलगा नरेश कुमार या ठगाने वडिलांचे बोगस जिवंत असल्याचा दाखल सादर करून आठ वर्षे पेन्शन घेतली अशी तक्रार ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांनी पोलिसांत दिली. यावेळी आरोपींनी दोन वेळा आपल्या वडिलांचा बनावट हयात असल्याचे बोगस प्रमाणपत्र कोषागार कार्यालय व बँकेत सादर केले.
१ डिसेंबर २०११ रोजी सेवानिवृत्त कर्मचारी बहरा यांचे निधन झाले. त्यानंतर दुसर्याच दिवशी त्याची पेन्शन थांबायला हवी होती, परंतु त्यांची पेन्शन पुढे ८ वर्ष चालूच राहिली. मृत कर्मचाऱ्याचा मुलगा नरेश कुमार एटीएमद्वारे किंवा कधीकधी चेकद्वारे किंवा ऑनलाइन शॉपिंगद्वारे पेन्शनची रक्कम काढत राहिला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
काबुल हादरलं! नमाजावेळी मशिदीत IED स्फोट, इमामासह चौघांचा मृत्यू
थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका
न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल
ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा
पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले
थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला
Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही