नागपुरात वेकोलिच्या व्यवस्थापकाला महिलेने केले ब्लॅकमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:26 PM2019-11-29T23:26:18+5:302019-11-29T23:28:27+5:30

वेकोलिच्या व्यवस्थापकाला एका महिलेने खोट्या रेप केसमध्ये अडकविण्याचा धाक दाखवून त्याच्याकडून १५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला.

WCL manager blackmail by woman in Nagpur | नागपुरात वेकोलिच्या व्यवस्थापकाला महिलेने केले ब्लॅकमेल

नागपुरात वेकोलिच्या व्यवस्थापकाला महिलेने केले ब्लॅकमेल

Next
ठळक मुद्देखोट्या रेप केसमध्ये फसविण्याची धमकी : १५ लाखांची खंडणी मागितली : सदनिकेवरही कब्जा करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेकोलिच्या व्यवस्थापकाला एका महिलेने खोट्या रेप केसमध्ये अडकविण्याचा धाक दाखवून त्याच्याकडून १५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर महिला आणि तिच्या साथीदाराने पीडित व्यक्तीची सदनिकाही हडपण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडून दोन वर्षे त्रास सहन केल्यानंतर धोका होण्याचे संकेत मिळाल्याने पीडित व्यक्तीने थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.
चिना शुभामाला रेड्डी (वय ५२) असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. ते चेतना अपार्टमेंट मानकापूर येथील रहिवासी असून सध्या वेकोलि चंद्रपूरला वरिष्ठ व्यवस्थापक असल्याचे कळते. आरोपी महिलेचे नाव सोनाली साखरे उर्फ सिमरण शर्मा (वय ३०) आहे. ती गड्डीगोदाममधील रहिवासी होय.
तीन वर्षांपूर्वी सोनालीसोबत एका मित्राच्या माध्यमातून रेड्डींची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि ती बहरतच गेली. रेड्डी यांची दोन्ही मुल शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी राहतात. पत्नीला त्यांच्या मैत्रीणीची माहिती कळाल्याने त्यांच्यात कलह निर्माण झाला. नंतर पत्नीही रेड्डी यांच्यापासून वेगळी राहू लागली. दरम्यान, रेड्डींच्या सोनालीसोबत भेटी गाठी वाढल्या. व्हॉटस्अ‍ॅपवरही हे दोघे निरंतर संपर्कात होते. एकमेकांना नको तशा क्लिपींगचे शेअरिंगही ते करीत होते. या दोघांना एकत्र बघून एका मित्राने रेड्डींना सोनालीबाबत सविस्तर माहिती देऊन तिच्यापासून दूर राहा, असा सल्ला दिला. तसे संकेत पूर्वीच रेड्डीला मिळाले होते. त्यामुळे त्यांनी सोनालींना टाळणे सुरू केले. फोनवरही प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे सोनाली संतापली. तिने रेड्डीला धमकावणे सुरू केले. आपल्या साथीदारांसह ती रेड्डींच्या सदनिकेत शिरली आणि त्यांना मारहाण करून त्याची क्लीप बनविली. यावेळी खोट्या रेप केसमध्ये अडकविण्याचा धाक दाखवून रेड्डी यांच्या खिशातून १५ हजार रुपये हिसकावून घेतले. १५ लाखांची खंडणी दिली नाही तर तुम्हाला उध्वस्त करू, अशी धमकी सोनाली आणि तिचे साथीदार रेड्डींना देत होते. एक दिवस त्यांनी रेड्डीच्या सदनिकेचे कुलूप तोडून कब्जा करण्याचाही प्रयत्न केला. सहनिवाश्यांच्या विरोधामुळे आरोपी सोनालीचा हा प्रयत्न फसला.
१३ सप्टेंबर २०१८ ला सोनालीने पुन्हा तेथे जाऊन आरडाओरड केली. रेड्डीकडून ही सदनिका विकत घेतल्याचे सांगून आपण पोलीस विभागात आहो, अशी बतावणी करत तिने सहनिवासींवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. तिच्या आणि साथीदाराच्या धाकामुळे रेड्डी घर बदलवून राहू लागले. त्यांनी सोनालीचे सर्व नंबर ब्लॉक केले. त्यामुळे सोनाली वेगवेगळ्या नंबरवरून त्यांना फोन करून धमकावू लागली. सेटलमेंटच्या नावाखाली तिने एकदा साथीदाराच्या माध्यमातून रेड्डींना जाफरनगरात बोलविले. तेथेही तिने रेड्डींना खंडणी मागितली. नकार देताच त्यांना खोलीत डांबून बेदम मारहाण केली. तिच्याकडून धोका होण्याचे संकेत मिळाल्याने त्रस्त झालेल्या रेड्डीने गुरुवारी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली. त्यांना आपली कैफियत ऐकवून मदतीची याचना केली. डॉ. उपाध्याय यांनी थेट मानकापूरच्या ठाणेदारांना या प्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रेड्डी यांची तक्रार नोंदवून सोनाली व साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

अनेकांना फसविले ?
सोनाली आधी एका हॉटेलमध्ये काम करायची. हॉटेलमध्ये येणाऱ्या काही जणांना तिने अशाच प्रकारे घुमविल्याची चर्चा होती. मोठा माल हाती लागल्याने ती निर्ढावली. नंतर तिने साथीदारांच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगलाच आपला व्यवसाय बनविला. रेड्डीसारखे अनेक जण तिने आपल्या जाळ्यात अडकवल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आल्याचे पोलीस सांगतात. बदनामीच्या धाकामुळे अनेकजण पोलिसांकडे येण्यासाठी कचरतात. त्याचाच गैरफायदा सोनाली सारख्या महिला घेतात. अनेकदा पोलिसांचीही भूमिका संशयास्पद ठरते. पीडितांनी थेट वरिष्ठांकडे तक्रारी केल्यास सोनालीसारख्या महिलांचा पर्दाफाश होऊ शकतो.

Web Title: WCL manager blackmail by woman in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.