"आपण कोणाचे देणे नाही", असं सुसाईट नोटमध्ये लिहून सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 04:19 PM2021-02-04T16:19:00+5:302021-02-04T16:19:44+5:30

Suicide : पुढील तपास सपोउपनि नारायण डप्पडवाड करत आहेत.

"We don't owe anyone," wrote the jweller in a suicide note | "आपण कोणाचे देणे नाही", असं सुसाईट नोटमध्ये लिहून सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या 

"आपण कोणाचे देणे नाही", असं सुसाईट नोटमध्ये लिहून सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या 

Next
ठळक मुद्देवलांडी येथील बाजारपेठेतील सोन्या- चांदीचे दुकानाचे मालक बालाजी धोंडिंबा कलमे (४२, रा. कोनाळी) यांनी वलांडी येथे गुरुवारी पहाटे घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

वलांडी (जि. लातूर) : देवणी  तालुक्यातील वलांडी येथील एका सराफा व्यापाऱ्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजले नाही.

देवणी पोलिसांनी सांगितले, वलांडी येथील बाजारपेठेतील सोन्या- चांदीचे दुकानाचे मालक बालाजी धोंडिंबा कलमे (४२, रा. कोनाळी) यांनी वलांडी येथे गुरुवारी पहाटे घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या कोनाळी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई ,भाऊ ,पत्नी , दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, वलांडी बाजारपेठ बंद ठेवुन श्रध्दाजंली वाहण्यात आली. या प्रकरणी देवणी पोलिसात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोउपनि नारायण डप्पडवाड करत आहेत.


मयताच्या खिशात चिठ्ठी....
मयत बालाजी कलमे यांनी मृत्युपुर्वी चिठ्ठी लिहून खिशात ठेवल्याचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, चिठ्ठीत आपण कोणाचे देणे नाही एवढेच लिहले असल्याने मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Web Title: "We don't owe anyone," wrote the jweller in a suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.