ललित पाटील ड्रग्जप्रकरणातील दोषी पोलिसांविरुद्ध गृहमंत्र्यांचं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 09:30 AM2023-10-29T09:30:04+5:302023-10-29T09:31:44+5:30

ड्रग्जप्रकरणातील मुख्य आरोपी ललितवर अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे स्वत:च उपचार करीत असल्याचे वैद्यकीय नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

We have also talked to the Chief Minister; Home Minister's big step against guilty police in Lalit Patil drug case | ललित पाटील ड्रग्जप्रकरणातील दोषी पोलिसांविरुद्ध गृहमंत्र्यांचं मोठं पाऊल

ललित पाटील ड्रग्जप्रकरणातील दोषी पोलिसांविरुद्ध गृहमंत्र्यांचं मोठं पाऊल

मुंबई - अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याच्यावर ससून रुग्णालयामध्ये सलग चार महिन्यांपेक्षा अधिक काळ उपचार सुरू होते. गोपनीय बाब असल्याच्या नावाखाली ‘ससून’चे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी याविषयी आजवर बोलणे टाळले होते. अखेर पोलिसांनीच कैदी वॉर्डमधील वैद्यकीय नोंदी ताब्यात घेतल्या असता धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे, हे प्रकरण अधिकच गंभीर होत आहे. यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी सुरू असून अनेक धागेदोरे समोर येत असल्याचं म्हटलं. तसेच, याप्रकरणी कोणालाही सोडणार नाही, ज्या पोलिसांचा यात सहभाग आढळून येईल त्यांना बडतर्फ करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी जाहीरपणे स्पष्ट केलं. 

ड्रग्जप्रकरणातील मुख्य आरोपी ललितवर अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे स्वत:च उपचार करीत असल्याचे वैद्यकीय नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. ललितला मूत्रपिंड विकार (हर्निया) होता. त्याच्यावर अधिष्ठाता डॉ. ठाकूर हेच उपचार करीत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यात जिन्यावरून पडून जखमी झाल्याची बतावणी करणाऱ्या ललितचे तीन वर्षांपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासासाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे, याप्रकरणी राज्य सरकार गंभीर असून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. याबाबत माहिती देताना गृहमंत्री फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.

गेल्या १५ वर्षात देशात आणि महाराष्ट्रात ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात सर्वच राज्यांच्या डीजींसोबत बैठक घेऊन चर्चा केली. तसेच, त्यासंदर्भात प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात अँटी ड्रग्ज कमिटी तयारी केली. त्याच पार्श्वभूमीवर मी पोलिसांना ड्रग्ज फ्री महाराष्ट्र हा सिंगल लाईन अजेंडा दिला, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच, ललिल पाटील प्रकरणावर भाष्य करताना शिवसेनेवर निशाणा साधला. उचचली जीभ लावली टाळूला, असं काहीचं काम आहे. कुठलाही पुरावा नाही, 

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील अटकेच्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नाशिक जिल्हाप्रमुख होता. तो नाशिकचा शिवसेना प्रमुख असल्याने २०२१ साली अटक झाल्यानंतर त्याला १४ दिवसांची पोलीस कस्टडी असताना तो चौदाही दिवस रुग्णालयातच होता. आता, सखोल चौकशी सुरू आहे, यातील धागेदोरे समोर आले आहेत. एकाला सोडणार नाही... आम्ही निर्णय केलाय, मी मुख्यमंत्र्यांशीही बोललोय. जे पोलिसवाले याच्या थेट इन्व्हॉल्व दिसतील, त्यांना थेट ३११ खाली बडतर्फ करणार.. असं इशाराच देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. 
 

Web Title: We have also talked to the Chief Minister; Home Minister's big step against guilty police in Lalit Patil drug case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.