बलात्कार होईल तेव्हा पाहू; तक्रार घेऊन गेलेल्या महिलेला उन्नाव पोलिसांचे उर्मट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 03:32 PM2019-12-07T15:32:52+5:302019-12-07T15:34:07+5:30
पीडित महिलेने सांगितले की, बलात्कार तर नाही ना झाला, जेव्हा होईल तेव्हा पाहू असे पोलीस म्हणाले.
उन्नाव - उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी आता या जगात राहिली नाही. मात्र, याच शहरातील एक दुसरी पीडित महिला या घटनेमुळे तिला सुद्धा आपल्यासोबत असंच होईल या चिंतेत आहे. उन्नावमध्ये एका महिलेसोबत काही नराधमांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पीडितेने कशीबशी आपली सुटका करून पळ काढला. या घटनेची तक्रार घेऊन ती पोलीस ठाण्यात पोचली. त्यावेळी त्या पीडित महिलेला पोलिसांचा वाईट अनुभव आला. पीडित महिलेने 'आजतक'ला सांगितले की, पोलीस कर्मचारी माझी तक्रार ऐकून घेण्यास तयार नव्हते. पीडित महिलेने सांगितले की, बलात्कार तर नाही ना झाला, जेव्हा होईल तेव्हा पाहू असे पोलीस म्हणाले.
बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला... झाला तर नाही ना
पीडित महिलेने सांगितले, पोलीस म्हणतात बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला, बलात्कार झाला नाही ना. पीडिनेते जर माझ्यावर बलात्कार झाला तर पोलीस काय करणार, आता तर मी जिवंत आहे. घटनेनंतर मी जिवंत देखील नसेन असे सांगितले.
तीन महिन्यांपासून पीडित महिला न्यायासाठी मारतेय चक्करा
उन्नाव येथे राहणाऱ्या या पीडित महिलेचे हे प्रकरण तीन महिने जुने आहे. औषध घेऊन घरी येत असताना या महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या पीडित महिलेने १०९० वर पोलिसांना फोन केला त्यावेळी तिला १०० क्रमांकाची जिप्सी पाठवत असल्याचे सांगितले. मात्र, घटनास्थळी पोलीस पोचलेच नाहीत. त्यानंतर पीडित महिलेने उन्नाव पोलीस कप्तान कार्यालयात फोन केल्यानंतर तिला जिथे घटना घडली तिथे तक्रार दाखल होईल असे उत्तर मिळाले. शेवटी कंटाळून पीडितेने कोर्टात केस दाखल केली. परंतु अद्याप आरोपींना अटक झाली नसून ते मोकाट आहेत. पीडिता गेली तीन महिने बिहार पोलीस ठाण्यात येरझऱ्या घालत होती. मात्र, अजून सुनावणी घेतली जात नाही आहे. पीडित महिलेने जवळपास ३० वेळा पोलीस ठाण्यात चक्करा घातल्या आहेत.
पोलीस मारतात टोमणे
पीडितेने पोलीस टोमणे मारतात असे सांगितले असून कुठेही जा आमची तक्रार करायला शेवटी इथेच यावे लावणार आहे असे पोलीस म्हणतात. बलात्काराच्या घटना सामान्य असून कमजोर लोकांची अब्रू घालवली जाते आणि पोलिसांकडून मदतीची आशा असते. पण मदत मिळत नाही असे पीडित महिला म्हणाली.