सुपर कॉप राकेश मारिया यांच्या कारकिर्दीवर वेबसीरीज; दिग्दर्शिका मेघना गुलजार दिग्दर्शित करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 04:42 PM2018-08-07T16:42:34+5:302018-08-07T16:47:15+5:30
26/11 चा मुंबईतील दहशतवादी हल्ला, 1993 चा साखळी बॉम्बस्फोट, शीना बोरा हत्याकांड, नीरज ग्रोव्हर हत्याकांड या घटना वेबसीरिजमधून दाखविणार
मुंबई - माजी मुंबई पोलीस आयुक्त आणि सुपर कॉप म्हणून ओळखले जाणारे राकेश मारिया यांच्या कारकिर्दीवर आधारीत एक वेबसीरीज येणार आहे. १९८१ च्या आयपीएस बॅचचे मारिया असून ते गेल्या वर्षी होम गार्ड विभागाच्या पोलीस महासंचालकपदी निवृत्त झाले आहेत. राजी सिनेमाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार ही वेबसीरिज दिग्दर्शित करणार आहेत. या वेबसीरीजमध्ये 26/11 चा मुंबईतील दहशतवादी हल्ला, 1993 चे साखळी बॉम्बस्फोट, शीना बोरा हत्याकांड, नीरज ग्रोव्हर हत्याकांड आदी विषय यात दाखवले जाणार आहे. राकेश मारिया यांच्यावरील ही वेबसीरिज, अनिल अंबानी यांच्या रिलायंस एन्टरटेन्मेंटच्या फॅण्टम फिल्म यांची निर्मिती असणार आहे. याची माहिती मेघना गुलजार यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
या वेबसीरिजबाबत राकेश मारिया उत्सुक आहेत आणि या वेबसीरीजमध्ये कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित राजी या सिनेमाने बॉलिवूडमधील 100 कोटी क्लबच्या सिनेमांच्या यादीत मोठ्या दिमाखात प्रवेश केला होता. एखाद्या महिला दिग्दर्शिकेने बनवलेला सिनेमा 100 कोटी रूपये कमावण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळेच आता या वेबसीरिजबद्दल उत्सुकता वाटत आहे.
Taut files of a top cop! An original series on the life and case files of former Mumbai CP, #RakeshMaria. Excited to be telling these stories with @RelianceEnt@FuhSePhantom & #MadhuMantenahttps://t.co/9rnaYoaOP9pic.twitter.com/VLpYJRanKw
— Meghna Gulzar (@meghnagulzar) August 6, 2018