सात फेरे होण्याआधीच रूममध्ये बसली होती नवरी, एक तरूण आला आणि गोळी झाडून फरार झाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 01:36 PM2022-04-29T13:36:53+5:302022-04-29T13:38:33+5:30
Bride Killed in her Marriage : मुबारकपूर येथे राहणारा खूबीराम यांची मुलगी काजलचं लग्न नोएडा येथील एका तरूणासोबत जुळलं होतं. गुरूवारी वरात आली.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मथुरामध्ये (Mathura) नवरीच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्री मुबारकपूर गावात लग्न समारंभादरम्यान नवरीची हत्या (Bride Killed in her Marriage) करण्यात आली. असं सांगितलं जात आहे की एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने नवरीवर गोळी झाडली. त्यानंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
मुबारकपूर येथे राहणारा खूबीराम यांची मुलगी काजलचं लग्न नोएडा येथील एका तरूणासोबत जुळलं होतं. गुरूवारी वरात आली. मोठ्या धामधुमीत रितीरिवाज पार पडले. काही रितीरिवाज शिल्लक होते. नवरी बनलेली काजल सात फेऱे घेण्याआधी रूममध्ये बसली होती. तेव्हाच तरूण रूममध्ये आला आणि त्याने तिच्यावर गोळी झाडली.
काजलच्या डोळ्याजवळ गोळी लागली. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. नवरीच्या मृत्यूनंतर लग्नात एकच गोंधळ उडाला. यादरम्यान आरोपी फरार झाला. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. असं सांगण्यात आलं की, आरोपी तरूणाने नवरीच्या हत्येआधी आपल्या साथीदारांसोबत वरातीतील पाहुण्यांना धमकावलं.
आरोपी तरूण गावातच राहणारा आहे. तेच मृत तरूणीच्या वडिलांनी सांगितलं की, हार घालण्यात आल्यानंतर लग्नाचे रितीरिवाजाची तयारी आत सुरू होती. यावेळी एक तरूण आल आणि गोळी झाडून फरार झाला. पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.