हिंगणघाटात राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमध्ये विवाह समारंभ; मालकाला दंड, तर आयोजकाला अभय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 09:07 PM2021-05-22T21:07:53+5:302021-05-22T21:08:10+5:30
Crime news: २२ मे रोजी कोविड नियमांचे तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत स्थानिक हॉटेलमधे विवाह पार पाडण्याचे ठरले. त्यानुसार नियोजित विवाहाची माहिती स्थानिक पोलिस विभागास मिळताच पोलिसांनी त्या हॉटेल मध्ये कारवाई केली.
हिंगणघाट( वर्धा) - कडक संचारबंदी काळात शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये विवाह समारंभ सुरु असतांना पोलिसांनी छापा टाकून प्रतिबंधित कारवाई करण्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
सदर विवाहात वधुपक्ष हा तालुक्यातील वणी(छोटी) येथील रहिवासी असून वरपक्ष हा अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील रहिवासी आहे.
२२ रोजी कोविड नियमांचे तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत स्थानिक हॉटेलमधे विवाह पार पाडण्याचे ठरले. त्यानुसार नियोजित विवाहाची माहिती स्थानिक पोलिस विभागास मिळताच पोलिसांनी त्या हॉटेल मध्ये कारवाई केली. नियमांचे उल्लघंन करणाऱ्या हॉटेल संचालकाकडून ३० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. मात्र सदर विवाहाची पूर्वपरवानगी नसल्याने वधु तसेच वर पक्षावर कोविड नियमांचे उल्लघंन केल्याबद्दल कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नाही असे समजते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात गेल्या ८ मे पासून कडक संचारबन्दी आदेश लागू केलेला आहे. त्याअनुषंगाने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.