लगीन ठरलं, मंडप सजला, वाजत गाजत वऱ्हाड आले; इतक्यात नवऱ्याला मिळाला १ फोटो, मग..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 05:57 PM2022-11-21T17:57:49+5:302022-11-21T17:58:03+5:30

ही संपूर्ण घटना मुलीकडच्या पाहुण्यांना कळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली.

Wedding Preparations Then Groom Got Girl Photo Relationship Broke Case Registered Sitamarhi | लगीन ठरलं, मंडप सजला, वाजत गाजत वऱ्हाड आले; इतक्यात नवऱ्याला मिळाला १ फोटो, मग..

लगीन ठरलं, मंडप सजला, वाजत गाजत वऱ्हाड आले; इतक्यात नवऱ्याला मिळाला १ फोटो, मग..

Next

सीतामढी - बिहारच्या सीतामढी भागात एका घरात लग्नाची धुमधडाक्यात तयारी सुरू होती. मुलीच्या घरचे वऱ्हाडाच्या स्वागतासाठी सज्ज होते. त्याचवेळी एका फोटोमुळे लग्न मंडपात भयाण शांतता पसरली. मुलीच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं नवरीचा अश्लिल फोटो नवरदेवाला पाठवला. व्हायरल झालेला फोटो पाहून युवक भडकला. त्याने मंडपात पोहचताच फोटोवरून गोंधळ घातला आणि लग्न मोडलं. 

ही संपूर्ण घटना मुलीकडच्या पाहुण्यांना कळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. मुलीच्या आईनं तक्रार नोंदवली. हे प्रकरण बाजपट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाशी संबंधित आहे. लग्न २१ नोव्हेंबरला होणार होतं. नवऱ्याचा साखरपुडा झाला होता. सर्व काही व्यवस्थित चालले होते. मुलाच्या बाजूने लग्नाच्या वऱ्हाडाची तयारी करण्यात आली होती. मुलीच्या बाजूनेही जवळपास सगळी तयारी जोरात सुरू होती. वऱ्हाडी आणि पाहुण्यांची सेवा आणि आदरातिथ्य यासाठी सज्ज होते. मुलीच्या हाताला मेहेंदी लावण्यात आली. लग्नात सहभागी होण्यासाठी काही नातेवाईकही पोहोचले होते. मात्र मुलीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाला हा सर्व प्रकार त्रासदायक वाटत होता. मग त्याने अशी युक्ती केली की ज्यामुळे हे लग्न मोडले.

नवरीचे अश्लिल फोटो नवऱ्याला पाठवले
मुलीच्या शेजारी असलेल्या या व्यक्तीने वधूचा अश्लील फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. त्याने नवऱ्याला मुलीचे अश्लील फोटोही पाठवले. त्यानंतर मुलाच्या बाजूने लग्नाचे नाते तोडण्यात आले. त्याचवेळी या घटनेने दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली. या संपूर्ण प्रकरणात मुलीच्या आईने जिल्ह्यातील बाजपट्टी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.

हे प्रकरण उघडकीस येताच, बाजपट्टी पोलिसांनी आयटी कायद्याच्या कलम 67(ए) अंतर्गत एफआयआर नोंदवला. आयटी अॅक्टचे प्रकरण असल्याने त्याच्या तपासाची जबाबदारी पुपरीचे पोलीस सर्कल इन्स्पेक्टर शशिभूषण सिंग यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आरोपी तरुणाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Wedding Preparations Then Groom Got Girl Photo Relationship Broke Case Registered Sitamarhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.