शाब्बास! पोलिसांच्या सतर्कमुळे बालविवाहाचे बिंग फुटले; उल्हासनगरात नवऱ्या मुलासह ६ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 06:59 PM2021-03-03T18:59:23+5:302021-03-03T18:59:49+5:30
Child marriage : नवऱ्या मुलासह नवरा व नवरीचे आई-वडील व लग्न लावून देणारा धर्मगुरू यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्या प्रमाणे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील मोर्यानगरी येथे १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाहाचे बिंग पोलिसांच्या सतर्कमुळे फुटले असून अल्पवयीन नवरी मुलीची रवानगी सासर ऐवजी महिला बालविभागाच्या हॉस्टेल मध्ये झाली. तर नवऱ्या मुलासह नवरा व नवरीचे आई-वडील व लग्न लावून देणारा धर्मगुरू यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्या प्रमाणे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-४ मधील मोर्यानगरी परिसरातील साई विहार रेसिडेन्सीच्या आवारात अल्पवयीन मुलीचे लग्न रविवारी दुपारी होत असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैलाल थोरात यांना मिळावी. थोरात यांनी त्वरित पोलीस पथकासह लग्नमंडप गाठले. त्यांनी नवरा मुलगा व नवरी मुलीला आपाआपली वय विचारले असता, नवरा मुलाचे वय २७ तर नवरा मुलीचे वय अवघे १३ वर्षाचे असल्याचे उघड झाले. याप्रकाराने पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यात आणून नवरी बालवधुची रवानगी सासर ऐवजी शहरातील महिला बालविभागाच्या हॉस्टेल मध्ये केली. तर नवरा मुलगा अभिजित राजगुरू, वडील गौतम राजगुरू, आई सुनीता राजगुरू तसेच नवरी बालवधूचे वडील राहुल देवकर, आई सविता देवकर व लग्न वाहून देणारे रमेश साळवे यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून गुन्हा दाखल केला.
सुशिक्षित कुटुंबा मध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याच्या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत आहे. लग्न लावून देणाऱ्या धर्मगुरूंनी तरी याबाबत सतर्क राहावे. असे पोलिसांनी सांगितले. याप्रकाराने धुमधडाक्यात सुरू असलेल्या लग्न मंडपात शांततेचे सावट पसरले. तर लग्नाला आलेली मंडळीने कारवाईच्या भीतीने आपापल्या घरी जाणे पसंद केले. याप्रकरणी विठ्ठलवाडी अधिक तपास करीत आहेत.