शाब्बास! रेल्वे पोलिसांनी धावत्या लोकलमधून पडलेल्या प्रवाशाचे प्राण असे वाचविले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 06:05 PM2021-08-10T18:05:43+5:302021-08-10T18:08:06+5:30
Railway police saved the life of a passenger : चुनाभट्टी रेल्वे स्थानकावर पोलीस अंमलदार नम्रता तांदळे दिवसपाळी कर्तव्यावर होत्या.
मुंबई - हार्बर मार्गावरील चुनाभट्टी स्थानकावर धावत्या लोकलमधून तोल जाऊन प्रवासी पडला. मात्र, स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या रेल्वेपोलिसाने प्रवाशाला तत्काळ खेचून प्रवाशाचा जीव वाचविला.
चुनाभट्टी रेल्वे स्थानकावर पोलीस अंमलदार नम्रता तांदळे दिवसपाळी कर्तव्यावर होत्या. त्यानंतर चुनाभट्टीच्या फलाट क्रमांक दोनवर सीएसएमटी दिशेकडे जाणारी लोकल थांबली होती. त्यानंतर सीएसएमटीकडे लोकल जाण्यासाठी लोकलने वेग वाढला. त्यामुळे लोकलच्या दरवाज्यावर उभ्या असलेला प्रवासी डब्यामधून तोल जाऊन फलाटावर पडला. त्यानंतर त्वरीत नम्रता तांदळे यांनी सर्तकता दाखवून त्याला बाजूला केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचविले. त्यानंतर या प्रवाशाला गोंदिया-नागपूर येथे जायचे असल्याने त्याने लगेच दुसरी लोकल पकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून बसविण्यात आले, अशी माहिती वडाळा रेल्वे ठाण्यातील पोलिसांनी दिली.
चुनाभट्टी रेल्वे स्थानकावर लोकलच्या दरवाज्यावर उभ्या असलेला प्रवासी डब्यामधून तोल जाऊन फलाटावर पडला अन्... pic.twitter.com/GM6iqIiEpW
— Lokmat (@MiLOKMAT) August 10, 2021