शाब्बास! या IPS अधिकाऱ्यांनी तपासचक्रं वेगाने फिरवली अन् केला ६९००० शिक्षक भरतीतील घोटाळा उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:07 PM2020-06-11T20:07:14+5:302020-06-11T20:09:04+5:30
प्रयागराजचे आयपीएस सत्यार्थ अनिरूद्ध पंकज, अशोक वेंकटेश आणि अनिल यादव या तिघांनी या घोटाळ्याची चौकशी सुरु केल्याने वेगाने तपासचक्रे फिरू लागली. या तिघांनी हा घोटाळा उघड केले.
प्रयागराज - उत्तर प्रदेशामध्ये ६९,००० शिक्षक सहाय्यक भरतीतील टॉपर्सच्या यादीतील काही नावे होती, त्याच्याविरोधात हजारो उमेदवाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. १५० गुणांपैकी १४० गुण प्राप्त करणाऱ्यांमध्ये कोणी ड्रायव्हर तर कोणी डीजेवाला बाबू असल्याचे सांगितले गेले. जेव्हा तक्रार मिळाली, तेव्हा प्रयागराजचे आयपीएस सत्यार्थ अनिरूद्ध पंकज, अशोक वेंकटेश आणि अनिल यादव या तिघांनी या घोटाळ्याची चौकशी सुरु केल्याने वेगाने तपासचक्रे फिरू लागली. या तिघांनी हा घोटाळा उघड केले.
या घोटाळ्याच्या तपासात पोलीस अधिकाऱ्यांनी पाळत ठेवण्यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. सीबीआयने आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. छापेमारीत आयपीएस अधिकारी असल्याने कोणाला याबाबत शंका आली नाही. डॉक्टर आणि लेखापाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. कारवाई जलद गतीने करण्यात आली आणि घोटाळेबाजांची पोल खोल झाली. आता या प्रकरणाचा तपास एसटीएफला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत एसटीएफपुढे मोठे आव्हान आहे. या टोळीत अद्याप शाळा व्यवस्थापक, सॉल्व्हर, दलाल आणि आरोपी उमेदवारांना अटक होणं बाकी आहे.
६९,००० सहाय्यक शिक्षक भरतीमध्ये उमेदवार डॉ. कृष्णालाल पटेल यांच्याविरूद्ध फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला, परंतु कोणीही तक्रार करण्यास पुढे आले नाही. उमेदवारांकडून रॅकेटमधील भामट्यांनी लाखो रुपये वसूल झाले होते. ते उमेदवार भीतीपोटी पुढे येत नव्हते. ४ जून रोजी प्रतापगढमधील उमेदवार राहुलसिंग यांनी एसएसपीकडे संपर्क साधला असता तातडीने कारवाईस सुरुवात झाली. एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी राहुलच्या तक्रारीवरून सोरांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
एसएसपीने एएसपी अशोक व्यंकटेश आणि अनिल यादव यांना शिक्षण क्षेत्रात प्रामाणिक, कष्टकरी उमेदवारांची उपेक्षा करणाऱ्या माफियांची यंत्रणा उध्वस्त करण्यासाठी तपास करण्यास सांगितले. काही तासात तपासाचा परिणाम दिसू लागला. सुरवातीला पोलिसांनी त्या सहा संशयितांसह कारमधून साडेसात लाख रुपये ताब्यात घेतले. पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ. कृष्णा लाल पटेल, शाळेचे संचालक ललित त्रिपाठी आणि लेखापाल संतोष बिंदू यांची चौकशी केली. या पथकाने त्यांच्याकडून २२ लाखाहून अधिक रोख रक्कम जप्त केली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Video : अग्नितांडव! क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग
थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला
Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही
खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या