कुटुंबासह ईदच्या खरेदीसाठी गेले अन् चोरट्याने रोख, दागिने नेले

By दयानंद पाईकराव | Published: April 16, 2023 04:42 PM2023-04-16T16:42:30+5:302023-04-16T16:42:38+5:30

अब्दुल वाहिद अब्दुल मजिद (४०, रजा टाऊन, हबीब मस्जिदजवळ, कपिलनगर) असे फिर्यादीचे नाव आहे.

Went for Eid shopping with family and thief took away cash, jewellery | कुटुंबासह ईदच्या खरेदीसाठी गेले अन् चोरट्याने रोख, दागिने नेले

कुटुंबासह ईदच्या खरेदीसाठी गेले अन् चोरट्याने रोख, दागिने नेले

googlenewsNext

नागपूर : कुटुंबासह ईदच्या खरेदीसाठी मोमिनपुरा येथे गेलेल्या व्यक्तीच्या घरातील ६.३७ लाखाचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने पळविला. ही घटना कपिलनगर पोलिस ठाण्यांतर्गत शुक्रवारी १४ एप्रिलच्या रात्री ९ ते १५ एप्रिलच्या मध्यरात्री २:३० वाजेदरम्यान घडली आहे. 

अब्दुल वाहिद अब्दुल मजिद (४०, रजा टाऊन, हबीब मस्जिदजवळ, कपिलनगर) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांचे अमरावती मार्गावर वाडी येथे हॉटेल आहे. ते आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबियांसह ईदच्या खरेदीसाठी मोमिनपुरा येथे गेले होते. खरेदी केल्यानंतर ते आपल्या बहिणीकडे थोडा वेळ थांबले. दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. 

आरोपीने बेडरुममधील लोखंडी आलमारीचे लॉक तोडून सोन्याचे दागीने व रोख ३.२५ लाख असा एकुण ६.३७ लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. जाताना आरोपीने मुख्य दाराची कडी आतुन लाऊन मागील दाराने पळ काढला. अब्दुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर ठाण्याचे उपनिरीक्षक भागवत काळींगे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना अब्दुल यांच्या घराजवळ असलेल्या मस्जिद आणि एका घरी असलेल्या सीसीटीव्हीत दोन संशयास्पद मुले दिसल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Went for Eid shopping with family and thief took away cash, jewellery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.