शिकवणीसाठी गेला अन् गायब झाला; डोंबिवली स्टेशनवरुन गायब झालेला मुलगा सापडला नाशिकला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 12:01 AM2019-09-05T00:01:57+5:302019-09-05T00:02:52+5:30

अपहरण की चुकून गेला हे स्पष्ट नाहीच

Went on to tution and disappeared; Missing boy from Dombivali station found at nashik | शिकवणीसाठी गेला अन् गायब झाला; डोंबिवली स्टेशनवरुन गायब झालेला मुलगा सापडला नाशिकला

शिकवणीसाठी गेला अन् गायब झाला; डोंबिवली स्टेशनवरुन गायब झालेला मुलगा सापडला नाशिकला

Next

जळगाव - शिकवणीसाठी घराबाहेरुन पडलेला गौरव दिनकर पाटील (१४,मुळ रा.लोण, ता.एरंडोल, रा. पीएनटी कॉलनी, डोंबिवली पूर्व, जि.ठाणे) हा मुलगा डोंबिवली रेल्वे स्थानकावरुन मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता गायब झाला. बुधवारी रेल्वे स्थानक परिसरात त्याची सायकल सापडली आणि दुपारी तो नाशिक रेल्वे स्थानकावर सापडला. दरम्यान, त्याचे अपहरण करण्यात आले होते की तो चुकून गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव पाटील हा आठवीच्या वर्गात डोंबिवली येथे शिक्षण घेतो. रोज सकाळी शिकवणीसाठी तो सायकलने जातो. घरापासून जास्त अंतर नसल्याने तो सायकलनेच जातो. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता तो डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून गायब झाला. शिकवणीच्या ठिकाणी पोहचला नाही व घरीही आला नाही म्हणून पालकांनी त्याचा शोध घ्यायला सुुरुवात केली. डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झालेला असून दप्तर व रेनकोट त्याच्याजवळ होता. एका कॅमेऱ्यात तो एकटा प्लॅटफार्मवर आहे तर दुसऱ्या कॅमेऱ्यात तो एका महिलेसोबत जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. चुकून तो लोकल गाडीत बसला असावा अशीही शक्यता होती. प्रत्येक रेल्वे स्थानकावर गौरवची माहिती कळविण्यात आली होती. दुपारी तो नाशिक रेल्वे स्थानकावर फिरताना आरपीएफच्या कर्मचाºयांना दिसला. त्याची चौकशी केली असता आपण येथे कसे आलो हे त्याला सांगता आले नाही. नाशिक पोलिसांनी डोंबिवली पोलीस व त्याच्या नातेवाईकांना ही माहिती कळविली. मुलगा सुखरुप असल्याची माहिती मिळताच पालकांची जीव भांड्यात पडला. नातेवाईक त्याला घेण्यासाठी नाशिकला पोहचले. रात्री उशिरा तो डोंबिवली पोहचला. नातेवाईक व पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्याचा फायदा झाला. गौरव याचे वडील डोंबिवली येथे बांधकाम कंत्राटदाराकडे कामाला आहेत. लोण, ता.एरंडोल येथील ते मूळ रहिवाशी आहेत. 

Web Title: Went on to tution and disappeared; Missing boy from Dombivali station found at nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.