हत्या की आत्महत्या? एकाच घरातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 03:47 PM2020-11-08T15:47:20+5:302020-11-08T15:54:20+5:30
Crime News : घरामध्ये पाच जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. परिस्थितीला कंटाळून काही जणांनी टोकाचं पाऊल उचल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान एकाच घरातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. घरामध्ये पाच जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यामधील गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह संशयास्पद पद्धतीने सापडल्यामुळे हत्या की आत्महत्या याचा सध्या तपास सुरू आहे. या मृत्यू प्रकरणामुळे पश्चिम बंगाल हादरलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्यांमध्ये दोन लहान मुलं आणि दोन महिलांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
West Bengal: Bodies of five people of the same family found today at their residence in Dakshin Dinajpur district.
— ANI (@ANI) November 8, 2020
"One body was found hanging & others had head injuries. Prima facie seems to be a case of murder & subsequent suicide. Further probe is on," say Police pic.twitter.com/tmeQbCCcgw
जालपूर गावातील एका घरात पाच जणांचे मृतदेह मिळाले. एका व्यक्तीचा मृतदेह हा गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. तर इतर व्यक्तींच्या डोक्यावर जखम असलेली पाहायला मिळाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनीआत्महत्या नसून हत्या असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे. एकंदरी घरातील अवस्था आणि मृतदेह पाहून पाचही जणांची हत्या झाल्याचं म्हटलं आहे.
पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी गुजरातच्या अहमदाबादमध्ये देखील एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह सापडले होते. सहा जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
रुग्णालयाच्या इमारतीवरून मारली उडी, घटनेने खळबळhttps://t.co/8MkYB5BorU#coronavirus#Karvachauth2020#suicide
— Lokmat (@MiLOKMAT) November 5, 2020
कोरोना वॉरियरने उचललं टोकाचं पाऊल, परिसरात खळबळhttps://t.co/q701ZvyoDb#CoronaWarriors#Suicide#death#Police
— Lokmat (@MiLOKMAT) November 2, 2020