कोलकाता बलात्कार प्रकरणाला नवं वळण, मुख्य आरोपी संजय रॉयनं जेल गार्डला काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 09:51 AM2024-08-25T09:51:16+5:302024-08-25T09:52:56+5:30
सीबीआय आणि पोलीस आरोपी संजय रॉयची सातत्याने चौकशी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्याच्या बोलण्यात प्रचंड विसंगती दिसत आहे...
पश्चिम बंगालमधील कोलकात्यातील आरजी कर मेडिकल हॉस्पिटल आणि कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज (रविवार 25 अगस्त, 2024) मुख्य आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात येणार आहे. या लाय डिटेक्टर टेस्टपूर्वी आरोपी संजय रॉयने या बल्ताकार आणि हत्या प्रकरणात आपण निर्दोष असून आपल्याला अडकवले जात असल्याचे म्हटले आहे. तत्पूर्वी, त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. याशिवाय, माजी प्राचार्य संदीप घोष आणि चार इतर डॉक्टरांसह सहा जणांची लाय डिटेक्टर टेस्ट यापूर्वीच करण्यात आली आहे.
या प्रकरणी कारागृह अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आलेल्या एका अहवालात सांगण्यात आले आहे की, आपल्याला हत्या आणि बलात्कारासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नाही, असे आरोपीने कारागृहातील सुरक्षा रक्षकाला सांगितले होते. मात्र, कोलकाता पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संजय रायने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि खून केल्याची कबुली दिली होती.
संजय रायने 23 ऑगस्टला सियालदह येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर आपण निर्दोष असल्याचा दावा करत, निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी टेस्टला संमतीही दिली होती. तसेच आपल्याला यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नसल्याचेही त्याने म्हटले होते.
संजय रॉयसंदर्भात काय म्हणतायत अधिकारी? -
सीबीआय आणि पोलीस आरोपी संजय रॉयची सातत्याने चौकशी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्याच्या बोलण्यात प्रचंड विसंगती दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमा आणि गुन्ह्याच्या वेळी सेमिनार हॉलमध्ये त्याची उपस्थिती यासंदर्भात विचारले असता, त्याला कसल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देता आले नाही. तो तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच गुन्ह्याच्या काही वेळापूर्वी सेमिनार हॉलकडे जाणाऱ्या कॉरिडॉरमध्ये तो काय करत होता हेदेखील तो सांगू शकला नाही.
पोर्नोग्राफीचं व्यसन! -
आरोपीला संजय रॉयला सेल क्रमांक 21 मध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या सेलबाहेर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. त्याला पॉर्नोग्राफीचे व्यसन असल्याचेही सीबीआयच्या अहवालात आढळून आले आहे. याशिवाय, डॉक्टरांचा हवाला देत तो जनवारांच्या प्रवृत्तीचा असल्याचेही म्हणण्यात आले आहे.