पत्नीला नोकरी लागली म्हणून पतीने केलं असं काही, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 12:20 PM2022-06-07T12:20:46+5:302022-06-07T12:21:09+5:30

West Bengal Crime News : बर्धमानच्या केतुग्राममध्ये राहणारी रेणु खातूनला काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये नर्स  नोकरी लागली होती. पत्नीने नोकरी जॉइन करताच पतीच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं.

West Bengal : Husband chops off wife hand angry she join government job | पत्नीला नोकरी लागली म्हणून पतीने केलं असं काही, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल...

पत्नीला नोकरी लागली म्हणून पतीने केलं असं काही, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल...

Next

West Bengal Crime News : पश्चिम बंगालच्या बर्धमानमधून एक फारच विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका पतीने पत्नीसोबत असं काही केलं ज्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. कारण इतकं शुल्लक होतं की, विचार करायला भाग पडाल. पतीने पत्नीचं मनगट हातापासून वेगळं केलं.  कारण इतकंच की, महिलेला नर्सची नोकरी मिळाली. पतीने यावर आनंद व्यक्ती करण्याऐवजी तिचं मनगट कापून हातापासून वेगळं केलं.

बर्धमानच्या केतुग्राममध्ये राहणारी रेणु खातूनला काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये नर्स  नोकरी लागली होती. पत्नीने नोकरी जॉइन करताच पतीच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं. त्याला वाटलं की, रेणु नोकरीवर जाऊ लागली तर ती त्याला सोडून निघून जाणार. मग त्याने मित्रासोबत मिळून प्लान केला आणि ती झोपेत असताना एका धारदार शस्त्राने तिच्या उजव्या हाताचं मनगट कापलं. रिपोर्टनुसार, आरोपी पतीने  रेणुचा हात उशीने दाबून धरला त्यानंतर मनगट कापून हातापासून वेगळं केलं.

त्यानंतर रक्ताने माखलेल्या रेणुला एका प्राथमिक चिकित्सा केंद्रात दाखल करण्यात आलं. नंतर तिची तब्येत अधिक बिघडल्याने तिला दुर्गापूरमधील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रेणुवर उपचार सुरू आहेत. तेच आरोपी पती घटनेपासून फरार आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: West Bengal : Husband chops off wife hand angry she join government job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.