बोंबला! 'नवी नोकरी लागणार आहे...', पत्नीला असं सांगत शेजारी महिलेसोबत पळून गेला पती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 04:29 PM2022-01-15T16:29:47+5:302022-01-15T16:30:04+5:30
Married Man run away with widow women : पीडित महिलेने सांगितलं की, तिने तिच्या पतीला सगळीकडे शोधलं, पण कुठेही सापडला नाही. काही वेळाने जेव्हा ती शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेकडे गेली तेव्हा सगळं प्रकरण समोर आलं.
पश्चिम बंगालच्या (West Bengal) हुगलीमधून अनैतिक संबंधाची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक विवाहित व्यक्ती शेजारी राहणाऱ्या विधवा (Married Man run away with widow women) महिलेला घेऊन पळाला. या व्यक्तीच्या पत्नी पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पीडित महिलेने सांगितलं की, तिने तिच्या पतीला सगळीकडे शोधलं, पण कुठेही सापडला नाही. काही वेळाने जेव्हा ती शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेकडे गेली तेव्हा सगळं प्रकरण समोर आलं.
पीडित महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, काही दिवसांपूर्वी तिचा पती काही महत्वाची कागदपत्र बॅगेत सांभाळून ठेवत होता. तिने पती शंभु मंडलला विचारलं की, तू असं का करत आहेस? यावर पतीने उत्तर दिलं की, एका चांगली नोकरी मिळणार आहे. मग त्याने सगळी कागदपत्रे बॅगेत भरली. तिला पतीवर जराही संशय आला नाही. नंतर दुपारी तिला पती कुठेतरी निघून गेला. बराच उशीर होऊनही तो परत आला नाही तेव्हा पत्नीने त्याचा शोध घेतला. पण तो काही सापडला नाही.
चिठ्ठीच्या माध्यमातून झाला खुलासा
जेव्हा ती पतीला शोध विधवा महिलेच्या घरी पोहोचली तेव्हा तिला तिथे एक चिठ्ठी सापडली. ज्यावर लिहिलं होतं की, ती तिच्या इच्छेने शंभु मंडलसोबत नवीन जीवनाची सुरूवात करण्यासाठी इथून पळून जात आहे. सोबतच तिने लिहिलं की, तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीतून काहीच नको. असं सांगितलं जात आहे की, शेजारी राहणाऱ्या महिलेच्या पतीचं निधन दोन वर्षाआधी झालं होतं. यानंतर शंभु मंडल आणि रीमा चौधरी यांच्यातील जवळीक वाढली होती. हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
पोलीस घेत आहेत शोध
शंभु मंडल आपल्या पत्नीला दगा देत शेजारच्या विधवा महिलेसोबत रोमान्स करत राहिला. पीडित महिलेने पोलिसांकडे आपल्या पतीला लवकरात लवकर शोधण्याची विनंती केली आहे. सोबतच पीडिता म्हणाली की, रीमा चौधरी आणि तिच्या पतीला कठोर शिक्षा द्यावी. पोलीस दोघांनाही शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.